५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जातेगांवला सभापती पद
५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जातेगांवला सभापती पद
अरुण हिंगमिरे, दि.२०… लोकसंख्येने नांदगाव तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाचे असलेल्या जातेगाव ला ५२ वर्षानंतर सभापती पदाचा मान मिळाल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला हितचिंतकांनी आणि नागरिकांनी सभापती अर्जुन पाटील यांची मिरवणूक काढली.
सविस्तर वृत्त असे की, २ सप्टेंबर १९४८ रोजी स्थापन झालेल्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी घाटमाथ्यावरील जातेगावचे भुमी पुत्र सन १९५३ मध्ये कै. काशिनाथ नाना पाटील एक वर्ष सभापती पदी होते, त्यानंतर सन १९७१ साली त्यांचेच पुतणे कै. यादवराव आंबुजी चव्हाण यांची दुसर्यांदा सभापती झाले होते. व अगदी अलीकडच्या काळात सन २००६ मध्ये बोलठाणचे राजेंद्र कन्हैयालाल नहार यांची तीसऱ्या वेळी सभापती पदी निवड झाली होती. कै. यादवराव चव्हाण यांच्या नंतर ५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्री अर्जुन (बंडू) पाटील यांच्यामुळे जातेगांवला बहुमान मिळाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करुन आ. कांदे यांचे आभार मानले. कै.काशिनाथ पाटील हे बंडू पाटील यांचे पंजोबा व यादवराव चव्हाण हे आजोबा होते, त्यांचे दोन चुलत्यांनी देखील वैजापूर तालुक्याचे विधानसभा सदस्य भुषविले आहे, बंडू पाटील यांना सामाजिक आणि राजकीय या दोन्ही क्षेत्राचे बाळकडू बालपणापासूनच मिळाले आहे.
शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात संचालकांच्या झालेल्या आ. सुहास कांदे व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संचालकांची बैठक झाली या प्रसंगी सभापती आणि उपसभापती निवडीचे सर्व अधिकार आ.कांदे व बापूसाहेब कवडे यांना सर्वानूमते देण्यात आले होते. सर्व संचालकांचे मनोगत ऐकून व विचार विनिमय करून अर्जुन पाटील आणि पोपट सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानुसार त्यांच्या विरोधात कोणाचे नामनिर्देशन पत्र नसल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अर्जुन (बंडू) पाटील यांची सभापती निवड झाल्याचे समजताच जातेगांव येथील त्यांच्या समर्थकांनी एकमेकांना पेढा भरवून व आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. त्यांचे सायंकाळी गावात आगमन होताच सवाद्य आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत मुंबादेवी चौकापासून गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पाटील यांनी ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाचे दर्शन घेवून श्रीफळ वाढविले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण श्रीफळ वाढवून दर्शन घेतले.मिरवनुकीच्या वेळी ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. तसेच नागरिकांनी शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले, यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय निकम, युवा सेना नेते गुलाबराव पाटील, रमेश पाटील, रमेश व्यवहारे, सुभाष पवार, भरत गायकवाड, संतोष गायकवाड, शिवाजी गायकवाड, बाबुभाई शेख, भाऊसाहेब चव्हाण, अनिल पवार, यांच्यासह ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व संचालक मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित सभापती अर्जुन पाटील यांनी सर्वाना सोबत घेत शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत कारभार करण्याची ग्वाही दिली. व आमदार सुहास अण्णा कांदे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे तसेच बाजार समितीचे एकनाथ सदगीर, कैलास पाटील, समाधान पाटील, अमित बोरसे, दर्शन आहेर, साहेबराव पगार, जीवन गरुड, सतीश बोरसे, अनिल वाघ, दीपक मोरे, अनिल सोनवणे, यज्ञेश कलंत्री, अमोल नावंदर, प्रकाश इपर, अलका कवडे आणि मंगला काकळीज या संचालकांचे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष प्रमोद भाबड, माजी सभापती तेज कवडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, राजाभाऊ पवार, राजाभाऊ देशमुख आणि शिवसेना नेते आणि हितचिंतक तसेच नागरिकांचे आभार व्यक्त केले.