नाशिक मधील महसरूळ परिसरामध्ये पती ने केले पत्नी वर वार. नंतर पतीची तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या.
नाशिक जनमत. म्हसरूळ परिसरांमध्ये पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करत स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पती ने पत्नी वर धारदार शस्त्रांनी वार केला त्यात पत्नी गंभीर जखमी झाली त्यानंतर पतीने घरावरून उडी घेत आत्महत्या करून आपला जीव संपवला आहे राजू रतन सिंग ठाकूर वय 50 असे या आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे तर पत्नीचं नाव चंदा राजू सिंग ठाकूर वय 45 असे पत्नीचे नाव आहे त्यानंतर पतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना आज दुपारी साडेचार ते पाच च्या दरम्यान घडली मसरूळच्या रामकृष्ण नगर येथील लक्ष्मी अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर येथे ही घटना घडली घरगुती वादातून पती-पत्नी भांडण झाले व त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे पतीने केलेल्या या या हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झालेले आहे तर पतीचा मृत्यू झालेला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अमोल तांबे पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिस पुढील तपास पोलीस करत आहे दरम्यान या घटनेने नाशिक शहर परिसरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे