आमदार कांदे यांच्या आमदार आपल्या दारी या संकल्पनेस मनमाड येथे उदंड प्रतिसाद.
आ. कादे यांच्या आमदार आपल्या दारी या संकल्पनेस मनमाड येथे उदंड प्रतिसाद
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
नांदगाव विधानसभा मतदार संघाचे इतिहासात आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आमदार आपल्या दारी या संकल्पनेद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मनमाड येथे जनता दरबाराचे आव्हान केले होते.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या अभूतपूर्व संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.आमदार कांदे व सर्व शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांनी महापुरुषांची प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाची तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांनी फित कापून उद्घाटन केले याप्रसंगी येथील गुरुकुल वाडी, माऊली नगर, किर्ती नगर, कोतवाल नगर, सिकंदर नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगर तिरंगा नगर व गौतम नगर या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार आपल्या दारी या कार्यक्रमात जवळपास 172 नागरिकांच्या समस्या तक्रार अर्ज दाखल झाले, यावेळी महिलांनी देखील बिनदिक्कतपणे आपल्या समस्या मांडल्या.
याप्रसंगी नगरपालिका, महावितरण संबंधित रेशन कार्ड संबंधित नागरिकांनी समस्या मांडल्या असता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे त्वरित आश्वासन दिले.
यावेळी *नगरपालिकेच्या कर्मचारी चकोर मॅडम यांचे सेवेत असताना कोरोना मुळे निधन झाले, त्यांच्या मातोश्री यांना पन्नास लाख रुपये धनादेश आमदार सुहास अण्णा कांदे व मुख्याधिकारी सचिन पवार पटेल यांच्या हस्ते देण्यात आला*
या कार्यक्रमासाठी शासकीय विभागातून तहसीलदार साहेब सिद्धार्थ मोरे, मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल पंचायत समितीचे अधिकारी वर्ग, मनमाड पोलिस स्टेशन एपीआय श्री गीते साहेब, बांधकाम खात्याचे खैरनार साहेब पवार साहेब कृषी विभाग नांदगाव तालुका आरोग्य विभागाचे डॉ. जगताप, भूमि अभिलेख विभागाचे नितनवरे उपस्थित होते.
यावेळी नागरिकांच्या बर्याच समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शहर प्रमुख मयूर बोरसे जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड जिल्हा समन्वयक भाऊ पाटील तालुका संघटक संजय कटारिया सुभाष माळवदकर गोटू केकान युवासेनेचे मुन्ना भाऊ दरगुडे अमीन पटेल अंकुश गवळी सिद्धार्थ छाजेड योगेश इमले, सचिन दरगुडे, ज्येष्ठ नेते अल्ताफ खान माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे पिंटू शिरसाठ, जाफर मिर्झा, नगरसेवक गालीब शेख, विनय आहेर, दिनेश घुगे, मुराद शेख यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रमुख महेश बोरसे यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल दराडे नाना पाटील यांनी केले.