पोलिसांच्या जाचास कंटाळून नाशिकरोड येथील सराफ व्यावसायिक दीपक दुसाने यांनी केलेल्या आत्महत्येची कसून चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई होणेबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन.
-पोलिसांच्या जाचास कंटाळून नाशिकरोड येथील सराफ व्यावसायिक दीपक दुसाने यांनी केलेल्या आत्महत्येची कसून चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई होणे बाबत पोलीस आयुक्तांना दिले निवेदन.
नाशिक जनमत नाशिकसह जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णकार समाज आणि सराफ व्यावसायिक अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने आपला सराफी व्यवसाय करीत असतात.परंतु त्यांना नाहक त्रास देऊन किंवा खोट्यानाट्या केसेसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे वसूल करण्याचा गोरखधंदा तपास यंत्रणांनी अवलंबला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे.सराफ व्यावसायिक हा सर्व अन्याय सहन करीत आहेत आणि त्याला कंटाळून काही व्यावसायिक आपले जीवन संपवत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी विजय बिरारी या सराफी व्यावसायिकाने परप्रांतीय तसेच स्थानिक पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती.आता त्याचीच पुनरावृत्ती नाशिकरोड येथे झाली आहे.जेलरोड येथे दुसानेबंधू ज्वेलर्स नावाने सराफी व्यवसाय करणाऱ्या दीपक दुसाने यांनी चोरीचे सोने विकत घेतले असा ठपका ठेवून कल्याण येथील पोलिसांनी त्यांची चौकशी केली,त्यांना धमकावले आणि खोट्यानाटया केसेसमध्ये अडकविण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून तीन लाख रुपये खंडणी स्वरूपात उकळल्याच्या त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे.या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी दीपक दुसाने यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांनीही आपले उखळ पांढरे करून घेतल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.आणि या सर्व जाचाच कंटाळून तसेच बदनामीच्या भीतीने दीपक दुसाने यांनी आपल्या राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली असावी असा सर्वांना दाट संशय आहे. दीपक यांच्या आत्महत्येस कल्याण पोलीस तसेच उपनगरचे पोलीसही सारखेच जबाबदार असून या संपूर्ण प्रकरणाचे कसून चौकशी व्हावी आणि दीपकच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी आमची कळकळीची विनंती आहे.याप्रकरणी दोषींवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत दीपकचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका दीपकचे नातेवाईक यांनी घेतली होती.मात्र मृतदेह ताब्यात न घेतल्यास त्याची परस्पर विल्हेवाट आम्ही लावू,अशी भाषा वापरणारे उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईनकर यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.माईनकर यांची भाषाशैली आणि देहबोली अत्यंत लाजिरवाणी,घृणास्पद आणि चीड आणणारीच होती.त्यामुळे त्यांची तातडीने उचलबांगडी व्हावी असा अशी आमची मागणी आहे.दीपक दुसाने यांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याबाबत सराफ व्यावसायिकांमध्ये संतापाची तीव्र लाट आहे.पोलिसांच्या दंडेलशाहीच्या निषेधार्थ सराफ व्यवसायिकांनी नाशिक महानगरात बंदची हाक दिली आहे.सर्व सराफ व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून पोलिसांच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला तसेच दीपक दुसाने यास श्रद्धांजली अर्पण केली आहे.याप्रकरणी कसून चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास आम्हाला महाराष्ट्र बंदची हाक द्यावी लागेल आणि होणाऱ्या परिणामांना पोलीस प्रशासनच जबाबदार राहील,हे लक्षात घ्यावे.असे ओबीसी सुवर्णकार समाज महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गजू भाऊ घोडके यांनी म्हटले आहे.
जाहिरातीसाठी संपर्क साधा 9273020944