पिंपळगाव टोल नाक्यावर महिला टोल कर्मचारी व सी आर पी एफ च्या पत्नीमध्ये हाणामारी. घटना सीसीटीव्ही मध्ये केद द
नासिक जनमत न्यूज पिंपळगाव टोल नाक्यावर काल दुपारी टोल वसुलीवरून महिला टोल कर्मचारी व एका सीआरपी च्या पत्नी मध्ये जोरदार फिल्मी स्टाईल मारामारी झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पिंपळगाव टोलनाक्यावरची कर्मचाऱ्यांचे आर्वी आर्वी ही नेहमीची झालेली आहे आमदार अनिल कदम तसेच पोलीस आयुक्त सचिन पाटील यांना देखील या टोलनाक्याचा व या कर्मचाऱ्यांचा स्वभावाचा दणका बसलेला आहे टोल नाक्यावरील कर्मचारी हे मुजरपणे वागत असतात दरम्यान ही घटना टोल देण्यावरून झाली की काय याची माहिती मिळाली नाही टोलनाक्यावरील सीसीटीव्ही मध्ये ही सर्व घटना केद झाली असून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सर्वसामान्य नागरिक टोल भरत असताना व्हीआयपी तसेच सर्वांना टोल भरावाच लागेल असे येथील कर्मचाऱ्यांचे नेहमी म्हणणे असते. दरम्यान कर्मचारी हे प्रामाणिकपणे काम करत असले तरी यांचे बोलणे उद्धट असल्याचे अनेकांना अनुभव आलेला आहे. राज्य सरकारने हा टोल बंद करावा अशी मागणी वाहनधारक करत आहे. काही ना काही कारणामुळे पिंपळगाव येथील टोल नाका नेहमी वादग्रस्त राहत आहे. स्थानिक नागरिक व टोल कर्मचारी यांच्यात देखील टोल देण्यावरून नेहमी खटके उडत आहे. कालच्या झालेल्या दोन्ही महिलांमधील हाणामारी काही नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मिटली असून पिंपळगाव ग्रामीण पोलीस यांना मात्र याचा सुगावा देखील लागला नाही. पिंपळगाव ग्रामीण पोलिसांनी टोलनाक्याकडे ग्रस्त वाढवणे महत्त्वाचे झालेले आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना पोलिसांचा वरदहस्त आहे. असे बोलले जात आहे.