कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा आणि महागोदावरी आरतीच्या पूर्वतयारीचा आढावा!

कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा आणि महागोदावरी आरतीच्या पूर्वतयारीचा आढावा!
नाशिक जनमत ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंड परिसरात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा व महागोदावरी आरतीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या समवेत रामकुंड परिसराची पाहणी केली.
या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आवश्यक पायाभूत सुविधा आणि सोहळ्याचे नियोजन याबाबत संबंधित प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या. संपूर्ण नाशिककारचे चे जोजा रोड कार्यक्रमाकडे लक्ष लागून आहेत. देश विदेशातून पर्यटक नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यांना चांगले सुविधा देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे 3000 पोलिसांचा फोर्स फाटा या वेळी उपस्थित राहणार आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन महापौर हिंमगोरी आडके. यांनी सर्व लक्ष गंगा गोदावरीवर ठेवत आहे. काल केलेल्या पाहणी दोरा दरम्यान 
विभागीय आयुक्त श्री. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त सौ. मनीषा खत्री, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, ओएसडी संदीप जाधव, पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्यासह प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, गंगा गोदावरी पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि रामतीर्थचे पदाधिकारी उपस्थित होते



