आकाश भाबड यांनी केला मॅजिकल तारखेला विश्व विक्रम.
नाशिक सह महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव
आकाश भाबड यांनी केला मॅजिकल तारखेला मॅजिकल विश्वविक्रम! आकाश भाबड यांनी 22-02-2022 या मॅजिकल तारखेला एक अनोखा मॅजिकल विश्वविक्रम केला आहे. त्यांनी त्यांच्या कंपनी ABCD इंटरनॅशनलच्या व्यासपीठावर एकामागून एक 22 देशातील 22 एज्युकेटर्स आणि उद्योजकांच्या 22 मिनिटांच्या विशेष मुलाखती घेत विश्वविक्रम केला. या कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व शिक्षक अनुभवी आणि आपापल्या देशातील अव्वल शिक्षकांच्या यादीत समाविष्ट आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम 11 तासांत पूर्ण झाला. हा विश्वविक्रम आकाश भाबड आणि त्यांची कंपनी ABCD इंटरनॅशनल यांचा दुसरा विश्वविक्रम आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, ग्रीस, अर्जेंटिना, मलेशिया, इटली, रोमानिया, आर्मेनिया, तैवान, पेरू, अमेरिका, मॉरिशस, रशिया, जॉर्जिया, लेबनॉन, भूतान, ब्राझील, मॅसेडोनिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नायजेरिया आणि श्रीलंका या देशातील एज्युकेटर्स सहभागी झाले होते. ABCD इंटरनॅशनल कंपनीचा हा विश्वविक्रम जगातील विविध देशांतील एज्युकेटर्स ला एका व्यासपीठावर आणण्याचे कारण ठरला. ज्याच्या मदतीने हे सर्व जागतिक एज्युकेटर्स शिक्षणाविषयी त्यांचे विचार व्यक्त करू शकतात. ह्या सर्व एज्युकेटर्स ने त्यांचे अनुभव, ज्ञान, यशाची रहस्ये आणि त्यांचा शिक्षण, शिक्षण पद्धती आणि शिक्षक यांच्या प्रती दृष्टिकोन मुलाखतीच्या माध्यमातून जगासमोर ठेवला. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व उपक्रम क्रमांक 22 आणि 2 शी संबंधित होते. या कार्यक्रमाची सहयोगी भागीदार कंपनी ‘भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन’ ने या प्रसंगी 8 पुस्तके प्रकाशित झाली. यामध्ये भारतासह आर्मेनिया, झिम्बाब्वे आणि रोमानिया येथील लेखकांचा समावेश होता. आकाश भाबड हे स्वतः लाईफ कोच आणि बिझनेस कोच म्हणून काम करतात. ते ऑथर्स सक्सेस कोच सुद्धा आहेत. त्यांची कंपनी ‘भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन’ हि 1 महिन्यातच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर कंपनी बनली आहे आणि विविध लोकांकडून त्यांना शुभेच्छा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आकाश भाबड यांचा प्रवास नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातील कासारी गावापासून सुरू झाला. पण, ते आज ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. आगामी काळात, आकाश भाबड, त्यांची कंपनी ABCD इंटरनॅशनल.जय हो नाशिक जंनमत तर्फे खूप खूप शुभेच्छा