दुभाजकाला धडकल्याने कार पेटली; पाच शिक्षक जखमी.
घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन परतताना मुरमाजवळ घटना
प्रतिनिधी संभाजीनगर सध्या श्रावण महिना चालू असल्याने मोठ्या प्रमाणात भावीक महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत काल कन्नड जवळील घृष्णेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या पाच भाविक शिक्षकांचा अपघात झाला. यात पाच शिक्षक गंभीर जखमी झाले.
वेरूळच्या घृष्णेश्वरचे दर्शन करून सोलापूरला परतणाऱ्या शिक्षकांची कार दुभाजकाला धडकल्याने कारने पेट घेतला. ही घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा शिवारात फौजी हॉटेलसमोर घडली. या अपघातात सोलापूरचे पाच शिक्षक जखमी झाले. सुरेश उटगीकर, सागर रामपुरे, तुकाराम
मुचंडे, विठ्ठल शिवशेठी, बाबू पवार अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व शिक्षक सोलापूरचे रहिवासी आहेत श्रावण सोमवारनिमित्त हे पाचह शिक्षक वेरूळ येथील घृष्णेश्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाटी आले होते.