ब्रेकिंग

जातेगाव येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी

जातेगांव येथे माता रमाई यांची १२५ वी जयंती उत्सवात साजरी

 

अरुण हिंगमीरे

जातेगांव, नांदगाव

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आणि ग्रामपालीकेच्या वतीने सोमवार दि.७ फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची १२५ वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माता रमाई यांच्या प्रतिमेचे उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, विजय पाटील, बाळासाहेब लाठे, रामदास पाटील, मा.उपसरपंच नारायण पवार, गुलाब चव्हाण, संतोष डांगे, अयुब शेख, संतोष गायकवाड, किशोर डोखे, नाना थोरात, शंकर लाठे, अशोक लाठे, आप्पासाहेब त्रिभुवन, सोपान खिरडकर, बाबुभाई शेख, राजु शेख, जाबिर शेख, यांच्यासह बौध्द उपाशीका सविता त्रिभुवन, लताबाई लाठे, सुरेखा त्रिभुवन, अनिता लाठे, हसिना शेख, हस्ते पुष्पहार अर्पण पुजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी उपसरपंच नारायण पवार, युवा सेना नेते गुलाबराव पाटील, संदिप पवार, रोहित त्रिभुवन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कडुबा महाले व बौध्दाचार्य तान्हाजी लाठे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक बौद्ध वंदना यांनी घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे