80 हजारांची लाच मागणारे वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या दोन सुभेदारांना लाच घेताना अटक.
नाशिक जनमत . मटका व्यवसाय सुरू करण्यासाठी ऐंशी हजाराच्या लाचेची मागणी करणारे वडाळीभोई पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी यांना चाळीस हजारांची लाच घेताना लाच लुचपत खात्याच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ अटक करण्यात केली. शुक्रवारी पोलीस ठाण्याच्या आवारात ही कारवाई केली किसन रमेश कापसे संतोष दिनकर वाघ अशी लाच घेण्याऱ्या पोलिसाची अशी त्यांची नावे आहेत. शिरवाडे फाटा येथे मटक्याचा व्यवसाय सुरू करायचा असल्याने संशयित किसन कापसे आणि संतोष वाघ यांना भेटले दोघांनी व्यावसायिकाकडे 80 हजारांची मागणी केली शेवटी 40 हजार रुपये ठरले. लाच लुच प्रतिबंधक पथकाने पोलीस ठाण्याच्या आवारात दोघा कर्मचाऱ्यांना कडून चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक झाली निरीक्षक .गायत्री जाधव प्रकाश महाजन प्रफुल्ल माळी इत्यादींनी यांनी ही कारवाई केली. या घटनेने पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.