ब्रेकिंग

दावल मलिक देवस्थान रस्ता करण्याची मागणी. भाविकांचे होतात मोठ्या प्रमाणात हाल.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून लवकरात लवकर रस्ता चांगला करावा भाविकांची मागणी.

दावल मलिक देवस्थान रस्ता करण्याची मागणी

 

नाशिक जनमत नामपूर, ता. २८ : मोसम खोऱ्यातील हिंदू मुस्लिम लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दावल मलिक बाबा देवस्थानचा डोंगर उतारावरील पायवाटेसारख्या रस्त्यामुळे अनेक भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देवस्थानास पर्यटनस्थळाचा दर्जा देउन बांधकाम विभागाने रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयेश घुगे यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींकडे केली आहे.

 

दावल मलिकबाबा दर्गा हे एक स्थळ हिंदू व मुस्लिम भाविकांचे श्रध्दास्थान असून गुरूवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. दावल मलीक बाबा दर्गाच्या दर्शनासाठी डोंगर चढतात आणि उतरतात. परंतु सदर रस्त्यावर कुठल्याही प्रकारची डोंगर कडेला संरक्षण नाही. दर्गावरून

 

(नामपूर : दावल मलिकबाबा देवस्थानचा परिसरातील अवघड वळणवाट.

 

दर्शन घेऊन परतताना उतारावर असणाऱ्या वळणवाटांमुळे जीव मुठीत घेऊन खाली यावे लागते.

 

देवस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही. खाली येताना भावीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो

 

(वाढती गदौ गेल्या अनेक वर्षांपासून

 

दर्शनासाठी येणारे ग्रामीण भागातील भाविकांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले गेले आहे. पार्कंग पासून येणारा व जाणारा मार्ग तसेच दर्गावरील महत्वाचे मार्ग तातडीने विकसित होणे काळाची गरज आहे. दर्शनाला जाणारे आबालवृद्ध, महिला, लहान मुले, भाविकांना आनंददायी वातावरणात दर्यावर जात आले पाहिजे, अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे.)

शकतो, त्यामुळे प्रशासनाने याकामी लक्ष घालून गडावर जाण्यासाठी रोडची व येणाऱ्या मार्गाची योग्य पाहाणी करून दावल मलिक दर्यास पर्यटनस्थळ दर्जा देण्यात येवून तातडीने रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र दावल मलिक बाबा देवस्थानचा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने विकासकामांपुढे अडचणीचा डोंगर उभा असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणं आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे