दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्यां संशयित व पोलिसांमध्ये चकमक. गुन्हेगाराच्या मांडीत घुसली गोळी.

पोलिसांवर फायरिंगचा प्रयत्न; मात्र संशयिताच्याच मांडीत घुसली गोळी
देवळालीत उपनगर पोलिसांची सतर्कता; आठ दरोडेखोर ताब्यात
प्रतिनिधी। नाशिक जन्मत लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या मार्गावर आलेत युवक लागले असून गुन्हेगारी चोरी घरपोडी लूटमार याकडे गुन्हेगारी जगत लागले आहे.
देवळालीगावच्या सुंदरनगर येथील मोकळ्या जागेवर ८ जण उभे होते. गस्तीवरील पोलिसांची गाडी बघताच ते दिसेल त्या दिशेला सैरावैरा पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यातील एकाकडून पोलिसांवर गोळीबार करण्यासाठी पॅन्टमधून पिस्तूल -काढताना ट्रीगर दाबले गेल्याने त्याच्याच मांडीत गोळी घुसून तो जखमी अवस्थेत पडला तर इतर ७जणांना पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ताब्यात घेतले.
तपासात ते आठहीजण सराईत गुन्हेगार असून दरोडा आणि व्यावसायिकाला लुटण्याची त्यांची तयारी सुरू असल्याचे उघडकीस आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उपनगर पोलिस ठाण्याचे डीबी पथक रात्री १ वाजता देवळालीगाव येथे गस्त करत होते. त्याचवेळी त्यांना ८ संशयित सुंदरनगर येथील मोकळ्या जागेवर उभे असलेले दिसले. पोलिस वाहन आल्याचे बंधून या संशयितांनीच मिळेल त्या दिशेने पळ काढला. पथकाने संशयितांचा पाठलाग सुरू
केला. संशयित गल्लीबोळातून पळत असताना त्यांच्यापैकी १९ वर्षांच्या सार्थक आहेर याने पोलिसांवर गोळीबार करण्यासाठी पँटच्या खिशात ठेवलेले पिस्तूल काढण्याचा प्रयत्न केला. मात्र खिशातच त्याच्याकडून ट्रीगर दाबले गेल्याने गोळी सुटून त्याच्या मांडीत घुसली. तो तेथेच जखमी अवस्थेत पडला. त्याला पथकाने पोलिस वाहनातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईला जे. जे. रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आहे.