महाराष्ट्र
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
*नाशिक, दिनांक 1 मे, 2022
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमास, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, भीमराज दराडे, वासंती
माळी, गणेश मिसाळ, नीलेश श्रींगी, ज्योती कावरे, स्वाती थविल, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, विधी अधिकारी हेमंत नागरे, तहसीलदार प्रशांत पाटील, रचना पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.