ब्रेकिंग
लासलगावला कांदे विक्री करण्यासाठी जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू.

नाशिक जनमत. मनमाड प्रतिनिधी मनमाड जवळील अस्तगाव येथील शेतकरी अजय नानासाहेब उगले वय 29हे कांद्याचा ट्रॅक्टर भरून मनमाड येथे कांदे विक्रीसाठी गेले होते. दरम्यान लिलावामध्ये कांद्याला भाव कमी आल्याने आपल्या वडिलांना फोन करून ते लासलगाव ला जास्त भाव मिळेल यासाठी लासलगाव येथे चालले होते. दरम्यान रायपुर निंबाळे रस्त्यावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे खड्ड्यात चुकवत असताना स्टरिग वरील हात निसटला. व ट्रॅक्टरच्या चाकाखाली ते आले. यावेळी ते गंभीर जखमी झाले दरम्यान आजूबाजूच्या गावकऱ्यांनी त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालय आणले असता डॉक्टर यांना मृत घोषित केले. या घटनेने अस्तगाव परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे