क्रिडा व मनोरंजन

पांडुरंग बाबा सूर्यवंशी एकनिष्ठावंत वारकरी. अण्णासाहेब महाराज आहेर

*पांडुरंग बाबा सुर्यवंशी एक निष्ठावंत वारकरी- आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर.* नाशिक- समाज काही व्यक्तींना मृत्युनंतर लगेच विसरतो.काही व्यक्ती मृत्यू नंतर वर्षभर स्मरणात राहतात तर काही व्यक्तींना समाज कधीच विसरत नाही.त्यांच्या कार्याने ते चिरंतर स्मरणात राहतात.वै.हभप पांडुरंग महाराज सुर्यवंशी यांचे वारकरी संप्रदायासाठी अनमोल कार्य होत ते एक निष्ठावंत वारकरी होते. वारकरी महामंडळ नाशिकचे अध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी त्यांना श्रध्दांजली वाहतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध विणेकरी हभप पांडुरंग महाराज सुर्यवंशी यांचे नुकतेच अकस्मात निधन झाले.ते नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वाहन चालक पदावरुन निवृत्त झाले होते.जन्मभूमी इगतपुरी तालुक्यातील पिंपळगांव डुकरा आहे. हभपश्री रामनाथ महाराज शिलापूरकर यांचेकडून अनुग्रह घेऊन संपुर्ण जीवनभर त्यांनी निष्काम परमार्थ केला. ते आयुष्यभर नाशिक येथेच स्थिर राहिले होते.त्यांच्या धार्मिक कार्याची दखल झी२४तास,टि व्ही नाईन व साईलिला चैनलने घेऊन संत श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात साईलिला चैनलने पंढरपूर पर्यंत त्यांचा विणेकरी पोशाखातील फोटो गाडीवर टाकून कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे.वारकरी महामंडळ नाशिक यांनी ही पदनियुक्ती करुन त्यांचा सन्मान केला होता.त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.व हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना दोन सुपुत्र आहे.जेष्ठ चिरंजीव श्री देवीदास पांडुरंग सुर्यवंशी हे अटोमोबाईल क्षेत्रात काम करतात.तर धाकले चिरंजीव श्री.संदिप पांडुरंग सुर्यवंशी हे पोस्ट ग्रॅजुएट असुन, दुबई रिटन आहेत,त्यांनी आपला कल व जम आता हॉटेलींग क्षेत्रात उमटवला आहे.श्री संदिप सुर्यवंशी यांनी दुबई वारीच्या पैशातून आपले वडीलांची स्वप्नपूर्ती म्हणून प्रशस्त बंगला बांधून आईवडीलांना एक सुखद धक्का देऊन त्यांची शान वाढवून परिवाराचा समाजात जनमानसात मान वाढविला आहे.आईवडीलांकरीता तर कोणीही दुःखी होईल परंतू पतीच्या वडीलावर पण तेवढंच प्रेम अशा दोन स्नुषा सौ.मोहीनी देवीदास सुर्यवंशी,सौ.स्नेहल संदिप सुर्यवंशी नेत्रातील जलाने सासरे बुवांच प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच नात कु.अमृता,स्वरा,नातू अथर्व भाऊ श्री रामदास दत्तु सुर्यवंशी, श्री.पंढरीनाथ दत्तु सुर्यवंशी,बहिण शकुंतला किसन जाधव दुगांव तसेच नातु हभपश्री बाळासाहेब भास्कर क्षिरसागर ओझरकर यांनीही दुःख व्यक्त केले आहे. इंदिरानगर येथील श्रध्दाविहार *पांडुरंग बंगलो* या त्यांच्या निवासस्थानाकडे शोक प्रगट करण्यासाठी वारकरी भाविकांची पाऊले घटना घडल्या पासून नित्य वळत आहेत.त्यांचा दशक्रिया विधी बुधवारी दि. २७!७!२२ रामकुंड नाशिक येथे संपन्न होईल अशी माहीती हभपश्री बाळासाहेब भास्कर क्षिरसागर ओझरकर यांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे आमदार सौ.सिमाताई हिरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच गुरूवर्य हभपश्री.रामनाथ महाराज शिलापुरकर, हभपश्री.रामकृष्ण महाराज लहवितकर, हभपश्री.राहुल महाराज साळुंके पाथर्डी यांनीही आदरांजली वाहिली आहे.⇔

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे