ब्रेकिंग

मुखेड गटातून मंत्री छगन भुजबळ यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ; गटातील ग्रामस्थांचा निर्धार*

*मुखेड गटातून मंत्री छगन भुजबळ यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ; गटातील ग्रामस्थांचा निर्धार*

 

 

*मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आमदार पंकज भुजबळ यांच्या मुखेड गटात तर विशाखा भुजबळ यांच्या देवगाव गटात भेटीगाठी*

 

*नाशिकजनमत. , येवला, दि. ८ नोव्हेंबर :-* मंत्री छगन भुजबळ यांनी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची विकासकामे केली आहेत. मतदारसंघाच्या भविष्यातील विकासासाठी मुखेड गटातून मंत्री छगन भुजबळ यांना सर्वाधिक मताधिक्य देऊ असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी मुखेड गटात तर त्यांच्या पत्नी विशाखा यांनी देवगाव गटात गाठीभेटी घेत प्रचार केला.

 

 

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँगेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट यांच्यासह महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आमदार पंकज भुजबळ यांनी आज मुखेड गटातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी गावातील नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक गावात आमदार पंकज भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत करून महिलांनी औक्षण केले. यापुढील काळात मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक विकासाची कामे मतदारसंघात केली जातील, असे आश्वस्त केले.

 

 

यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, प्रा. अर्जुन कोकाटे, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, नितीन गायकवाड,भूषण लाघवे, माधवराव पवार, प्रकाश बोराडे, पोपट बोराडे, सोमनाथ सोनवणे, संतोष लभडे, प्रकाश लभडे, अशोक बुराडे, मच्छिंद्र ठोंबरे, तुळशीराम कोकाटे, उत्तम घुले, भाऊसाहेब कळसकर, भूषण गोठी यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

 

*विशाखा भुजबळ यांच्या देवगाव गटात भेटीगाठी*

 

 

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यांच्या स्नुषा सौ. विशाखा भुजबळ यांनी आज देवगाव गटात विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. देवगाव गटातील देवगाव, महादेवनगर, वाकद, शिरवाडे, कानळद, कोळगाव, खेडलेझुंगे, सारोळे, नांदूरमध्यमेश्वर, दिंडोरी तास, गाजरवाडी, धारणगाव खडक, धारणगाव वीर, रुई, धानोरे आदी गावांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासकामांबद्दल महिलांनी तोंडभरुन कौतुक केले. तसेच, त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोकामना महिलांनी विशाखा यांच्यासमोर बोलून दाखविली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे