ब्रेकिंग
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात कमळ फुलणार. मतदारांचा प्रचाररॅलीना मोठा प्रतिसाद.
नाशिक मध्य विधानसभा
मतदारसंघात कमळ फुलणार
नाशिक जन्मत. (प्रतिनिधी) – सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत वेगवान घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अंकुश पवार यांनी नाशिक मध्य मतदारसंघातून माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काल ( दि. ७ ) महायुतीच्या उमेदवार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी मनसेचे नेते व माजी महापौर अशोक मुर्तडक यांची भेट घेऊन आभार मानले. आपल्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी मुर्तडक यांनी शुभेच्छा दिल्या.
- गेल्या दोन पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होता. यंदा त्याचीच पुनरावृत्ती होईल. महायुती – भाजपच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे हॅटट्रिक करतील. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात यंदाही कमळ फुलणार असा निश्चय कार्यकर्त्यांनी केला आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. त्यापूर्वी भाजपासोबत महायुतीतील शिवसेना ( शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचार यंत्रणा राबवत आहेत असे चित्र स्पष्टपणे दिसून येते. उमेदवार प्रा.देवयानी फरांदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या समाजोपयोगी कार्याचा आढावा मतदारांसमोर विविध स्वरूपात मांडण्यात येत आहे. त्यातून कार्यसम्राट योजनाबध्द विकास कसा घडवून आणू शकतो हेच स्पष्ट होते आहे.