पाच जणांच्या टोळीकडून पाथर्डी गावात एकाचा खून.

नाशिक जनमत.
नाशिक सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली असून या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस कुठेतरी कमी पडत असल्याचे नाशिक शहरात दिसत आहे आठ दिवस होत नाही तर कुठेतरी खुना ची घटना घडत आहे. रात्रीची गस्तव तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसल्याने खुनासारख्या घटना नाशिक शहरात वाढू लागले आहे.
नाशिक शहराच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये एका युवकाचा नाव नदेश साळवे याचा पाच जणांनी धारदार हत्याराने त्याच्यावर वार करत खून केल्याचा प्रकार काल घडला. या पकरणी एका संशयित युवकास ताब्यात घेण्यात आले आहे. तर बाकी हल्लेखोरांचा शोध सुरू आहे .याबाबत अधिक माहिती अशी की वेल्लोळी गावातील नंदेश साळवे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रात्री पाथर्डीतील राजवाडा येथे आला होता .दरम्यान पाच जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्रने हल्ला केल्याने नंदेश जखमी झाला. त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. असता डॉक्टर आणि त्या मृत्यू घोषित केले .गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने एकाच ताब्यात घेतले असून अधिक तपास चालू आहे .दरम्यान या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडली असून नाशिक शहरात गुन्हेगारी कमी होत नसल्याचे दिसत आहे. दिवसाढवळया युवक हातात कोयते व हत्यार घेऊन हाणामारी व खून करण्यास मागेपुढे बघत नसल्याचे चित्र सर्वत्र नाशिक शहरात दिसत आहे. रात्रीची गस्त कमी प्रमाणात सर्वत्र दिसत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे आंदोलन तसेच सण यामुळे पोलीस वर्गावरील देखील ताण वाढलेला आहे. पोलीस कर्मचारी संख्या नाशिक शहरात वाढवणे जरुरीचे झालेले आहे दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा खुणाची घटना घडल्याने नागरिक कान मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः रात्री रस्त्यावर येऊन सहकाऱ्यांसोबत गस्त वाढून गुन्हेगारी आटोक्यात आणावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.