ब्रेकिंग

शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ : विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम*

*शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ : विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम*

नाशिक, दि. १४ : महसूल विभागामार्फत राज्य ई-पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतक-यांना आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणीची मुदत रविवार पर्यंत (दि. १५ सप्टेंबर)

होती. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप द्वारे पीक पेरा नोंदविला नसल्याने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी २३ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी दिली. नाशिक विभागातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामात केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारे पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

खरीप हंगाम २०२४-२५ करिता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी महसूल दिनापासून (१ ऑगस्ट, २०२४) सुरुवात झाली. दि. १५ सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करता येणार होती. परंतू, राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी विहीत मुदतीत पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कळविले आहे.

 

खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये दि. १३ सप्टेंबर पर्यंत नाशिक विभागात १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास १६ लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पीक पाहणी नोंदविण्यात आलेली नाही. राज्य शासनाने “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा” च्या उद्देशाने स्वतः च्या शेताची पीक पाहणी स्वतः करण्याची संधी ई पीक पाहणी ॲपद्वारे राज्यातील सर्व शेतक-यांना उपलब्ध करून दिली आहे. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तसेच भूसंपादन इ. करिता ई-पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले आहे.

 

ई-पीक पाहणी करण्यामध्ये काही समस्या असल्यास 02025712712 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन मदत घेता येऊ शकते. इंटरनेटची आवश्यकता फक्त शेतकरी नोंदणी वा पिक पाहणी अपलोड करणेकामी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतामध्ये इंटरनेट सुविधा नाही, त्याठिकाणी सुद्धा पीक पाहणी करता येते.

 

सहाय्यक/तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविण्यासाठी देखील सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता दि.२४ सप्टेंबर ते २३ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत सहाय्यक/तलाठी पीक पाहणी नोंदवू शकतात, असेही त्यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे