ब्रेकिंग

महानगरपालिकेचे लाखो रुपये खड्ड्यात. पाऊस होताच खड्डे पे खड्डा..

पाऊस पडताच खड्डे पे खड्डा. पाणी आणि डांबर मेळ धरत नाही.

नाशिक जनमत. गेल्या दोन महिन्यांमध्ये नाशिक शहरात रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. पूर्णपणे  रस्त्यांची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षासह नागरिक यांनी अनेकदा महानगरपालिकेला निवेदन देखील दिले आहे. महानगरपालिकेतर्फे खड्डे बुजवण्याच्. केविलवाला प्रयत्न चालू आहे.  डांबर खडी टाकून हे खड्डे बुजवल्या जातात. त्यानंतर एकच तासांमध्ये रिमझिम पाऊस येतो. आणि पुन्हा मोठा खड्डा या ठिकाणी पडतो.  त्यामुळे महानगरपालिकेची संपूर्ण मेहनत ही वाया जात आहे. उन्हाळ्यात केली जाणारी डांबरीकरणाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जातात. आर्थिक . टक्केवारी. यामुळे ठेकेदार काम निकृष्टपणे करतो. त्यामुळे पहिल्या पावसापासूनच रस्ते पूर्ण खड्डेमय होतात. यामुळे लाहान मोठ्या अपघात होतात. अनेक जणांचे मोटरसायकलवर दिवसभर अनेक भागात प्रवास असल्याने कंबर मान पाठ दुखी असे आजार देखील लागलेले आहे. टू व्हीलर फोर व्हीलर चा मेंटेनेस वाढला आहे. काही नवीन विकास होणाऱ्या भागामध्ये तर रस्तेच राहिले नाही.  सर्वत्र खड्डे आहेत .या भागांमध्ये रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहे. रहिवासी क्षेत्रातील अनेक नागरिकांना आपली वाहने दुसऱ्या सोसायटी च्यां पुढे लावावे  लागतं आहे. काही ठिकाणी मुरूम मिश्रित माती खड्ड्यांमध्ये टाकतात. त्यामुळे थोड्याशा पावसाने पुन्हा खड्डा होतो. दरम्यान या खड्डे बुजवण्यावर कोट्यावधी रुपये खर्च होतात . व महानगरपालिका हा सर्व पैसा खर्च नागरिकांनी भरलेल्या ट्रॅक्स मधून केला जातो. त्यामुळे एक तर नाशिक शहरात सर्वत्र कॉंक्रिटीकरन रस्ते होणे महत्त्वाचे आहे. किंवा रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची होणे महत्त्वाची झाली आहे. आता तरी महानगरपालिकेने काही दिवस

 

 

पाऊस असेल तर थांबून. पाऊस उघडतात युद्ध पातळीवर रस्त्याची कामे करावी. काही ठिकाणी तर खड्डा नसताना जेसीबीच्या साह्याने त्या ठिकाणी रस्ता ऊखरला जातो व त्या ठिकाणी डांबर खडी टाकून मोठे खड्डे दाखवले जाते. यातून ठेकेदाराला मोठा पैसा मिळत आहे. छोटे खड्डे व मोठे खड्डे तसेच ठेवून असा प्रकार नाशिक शहरात चालू आहे. सिडको सातपूर पाथर्डी फाटा मखमलाबाद रोड अशा ठिकाणी हे सर्व प्रकार सरासपणे चालू आहे. खड्डे बुजवण्यात ठेकेदार व त्याच्या विभागीय कार्यालयात येणाऱ्या बांधकाम विभागाचे अधिकारी देखील सहभागी असल्याचा संशय नागरिकांना येत आहे. रस्ते व खड्डे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. दरम्यान बांधकाम विभागातर्फे जास्त पाऊस झाल्यामुळे खड्डे झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे. रस्ते खराब असताना ट्राफिक पोलिसातर्फे हेल्मेट व कागदपत्र तपासणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात व वाहन धारकांना दंड देखील भरावा लागत आहे. अगोदर रस्ते चांगले करा नंतर दंड आकारा असे वांहण धारकांतर्फे बोलले जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे