तहसीलदार नितीन गर्जे यांच्या हस्ते आज अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी दिव्यांग बांधवांना पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात आली.*
नितीन गर्जे साहेब यांच्या हस्ते आज अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी दिव्यांग बांधवांना पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात आली.*
नाशिक जनमत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनस्तरावर अंत्योदय रेशन कार्ड योजना व अन्न योजना राबविण्यात येत असून शहरातील दिव्यांग बांधवांनी कागदपत्रांचा पाठपुरावा करून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार नितीन गर्जे साहेब यांनी केले आहे
अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्ड वाटप कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार नितीन गर्जे साहेब यांनी उपस्थित दिव्यांगांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले तसेच अन्नपुरवठा निरीक्षक श्री, रमेश गायकवाड साहेब व अव्वल कारकून श्रीमती दिपाली घुगे मॅडम यांनी सर्व उपस्थित दिव्यांग बांधवांना मोलाचे सहकार्य केले तसेच केशरी रंगाची शिधापत्रिका बदलून पिवळ्या रंगाची शिधापत्रिका उपलब्ध करून दिली
उपस्थित दिव्यांग बांधवांना नाशिक रोड धान्य वितरण कार्यालय यांच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व शहरातील दिव्यांग बांधव यांनी अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनी केशरी रंगाची शिधापत्रिका बदलून पिवळी रंगाची शिधापत्रिका धान्य वितरण कार्यालय नाशिक रोड येथून अंत्योदय अन्न योजनेच्या सर्व अटी व शर्तीची व कागदपत्रांची पूर्तता करून अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घ्यावा व पिवळी रंगाची शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अनिल साळवे तसेच आम आदमी पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते दिपक सरोदे सामाजिक कार्यकर्ते मंगेश आढाव सामाजिक कार्यकर्ते गौतम सोनवणे दिव्यांग संघटनेचे प्रमुख साजिद पठाण व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बोराळे यांनी सर्व दिव्यांग बांधवांना आव्हान केले