मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना;* *अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरू*
*मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना;*
*अर्ज भरण्यासाठी नवीन संकेतस्थळ सुरू*
*नाशिक, दिनांक 1 ऑगस्ट, 2024 नाशिक जनमत. वृत्तसेवा):* मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यादृष्टीने आज 1 ऑगस्ट 2024 पासून महिला व बाल विकास विभागाकडून https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
या संकेतस्थळावर लाभार्थ्यांसाठी योजनेच्या लाभासाठी पात्रता, अपात्रता तसेच अर्ज भरण्याविषयी माहिती उपलब्ध करून दिली आहे. ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी नारिशक्तीदूत ॲपवर अर्ज भरलेले असतील त्यांनी या पोर्टलवर पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही. परंतु ज्या इच्छुक लाभार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरलेले नाही त्यांनी या संकेतस्थळावरून आपले अर्ज भरावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे