ब्रेकिंग
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था निवडणूक. चार पॅनल मध्ये चुरस वाढली.. अपक्ष उमेदवार चंद्रकांत धात्रक यांना मोठी पसंती.
- नाशिक जनमत क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था पंचवार्षिक निवडणूक प्रचार घराची रणधुमाळी सध्या चालू आहे. व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा चार पॅनल पडले असून चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. अतिशय प्रतिष्ठित असे उमेदवार या चारी पॅनलमध्ये उमेदवारी करत आहे गेल्या दहा दिवसापासून अनेक गावोगावी सभा बैठका होत आहे.. प्रामुख्याने या सभेमध्ये सभासद हा मुद्दा गाजतो आहे गेल्या 30 वर्षापासून या संस्थेमध्ये कोणतेही नवीन सभासद न केल्याने सरासरी सभासदांचे वय 60 65 वयाचे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नवीन सभासद करावे असे अनेक सभासदांची मागणी होती परंतु संस्थेवर असलेल्या कारभारी यांनी नवीन सभासद न केल्याने नाराजी सभासदांमध्ये पसरलेली होती. व गेल्या 30 वर्षापासून तेच उमेदवार अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस विश्वस्त पुन्हा तेच तेच यास अनेक सभासद कंटाळले आहेत. व्हेन नाईक संस्थेच्या 70 शाखा असून 25 हजाराच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. डिप्लोमा डिग्री इत्यादी प्रकारचे कॉलेज सध्या या शिक्षण संस्थेचे आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेनंतर व्ही एन नाईक संस्था नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या नंबर वर असल्याचे सांगण्यात येत आहे. संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत असली तरी आणि त्रुटी सभासदांना दिसून येतात . शिक्षण संस्थेकडे 28 कोटी शिल्लक असले तरी निर्णय शिक्षण संस्थेची मेडिकल कॉलेज एमबीए कॉलेज कृषी कॉलेज नर्सिंग कॉलेज तसेच मोठे सभागृह. नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी नवीन चेहरे या वेळेस या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. क्रांतिवीर पॅनल प्रगती पॅनल परिवर्तन पॅनल आणि नवीन चेहऱ्यांचा नवऊर्जा पॅनल यामध्ये खऱ्या अर्थाने लढ्त होत आहे. मागील काही निवडणुकी संस्थेच्या निवडणुकीपासून शेवटच्या दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी दर्शन मतदारांना होऊ लागले आहे. यावर्षी तर मोठा उंचांक यामध्ये वाढलेला आहे ग्रामीण भागामध्ये काही पॅनल कडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन मतदारांना बंद पाकीट दिल्या जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे त्यामुळे ही निवडणूक धनश्री विरुद्ध सर्वसामान्य उमेदवारांची आहे या निवडणुकीमध्ये अनेक पॅनल मध्ये कुणी ना कुणी कुणाचे नातेवाईक आहेत दरम्यान अनेक जण लक्ष्मी दर्शन घेऊन उमेदवारांना त्यांची जागा दाखवून देणार आहे असे अनेक मतदारांनी बोलून दाखवले दरम्यान काही सभासदांना असा प्रश्न पडला आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे पाकीट वाटल्या जात आहे हा पैसा येतो तरी कुठून असा प्रश्न सज्ञान सभासदांना पडलेला आहे दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये या चौरंगी लढत मध्ये रंगत वाढली आहेत आणि पॅनल मध्ये समाजाच्या मोठ्या नेत्यांचे फोटो व्हिडिओ यावरून चढावढ चालू देखील चालू झाले आहे. या निवडणुकीचे विशिष्ट म्हणजे प्रथमच या निवडणुकीमध्ये पत्रकार अपक्ष उमेदवार म्हणून नासिक जनमत चे संपादक उमेदवार आहेत एकीकडे सर्व पॅनल भर पावसात गावोगावी भेट देत असताना चंद्रकांत धात्रक पत्रकार हे सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत व फोनवरून आतापर्यंत अडीच हजार सभासदांना फोन करून त्यांचे विचार जाणून व आपले विचार त्यांना देऊन जोरदार चर्चा करत आहे व आपला प्रचार देखील करत आहे यामध्ये अनेक सभासदांनी आम्ही आपणास एक मत देऊन शंभर टक्के निवडून देऊ असे आश्वासन अनेक सभासदांनी दिले आहे. निवडणूक ही साठी लागणाऱ्या पाचशे रुपये डिपॉझिट 300 रुपये यादी चारशे रुपयाची दोन फॉर्म .दोनशे रुपये झेरॉक्स इत्यादी पेक्षा एक रुपया देखील खर्च न करता सोशल मीडिया आणि फोनवर प्रत्यक्ष भेट यावरून निवडणूक लढत आहे फेसबुक व्हाट्सअप याचा उपयोग करून मतदारांमध्ये ते लोकप्रिय झाले आहेत. नियोजनबद्ध त्यांच्या प्रचार चालू असून मतदार मोठ्या प्रमाणात त्यांना पसंती देत आहे त्यामुळे ते जोर का झटका धीरे से देण्याची दाट शक्यता आहे उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून ग्रामीण भागात सभासदांमध्ये मोठ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. व्ही एन नाईक संस्था निवडणुकीनिमित्ताने काही मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याने आनंद होत आहे . विद्या आणि सरस्वती ज्ञान या संस्थेत भेटते या संस्थेत मतासाठी पैसे द्यावा लागतात ही आश्चर्यकारक गोष्ट याबद्दल अनेक सभासदांमध्ये कुत्वल निर्माण झाले आहे. दरम्यान पत्रकार चंद्रकांत धात्रक यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे व संस्थेची सेवा करण्याची संधी द्यावी अशी चंद्रकांत धात्रक यांनी सांगितले आहे फेसबुक वर त्यांची निशाणी बॅट्समन व त्यांची क्रिकेट खेळताना चे फोटो यांचे
रिल लोकप्रिय होत आहे .जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांनी रील बघितले आहे. गेल्या दोन निवडणुका पसून शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीला राजकीय वळण लागल्याचे चित्र आहे. समाजाचे प्रतिष्ठित उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहे या मुळे निवडणुकीला युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.