नासिक मध्ये अग्नी तांडव. नाशिकचे खासदार करतायेत पर्यटन व देवदर्शन ..
नाशिक जनमत. नवीन वर्ष आरंभीच नाशिक मध्ये मुंडेगाव या ठिकाणी असलेल्या जिंदल कारखान्यात मोठे अग्नि तांडव घडले आहे काल अकरा वाजता या कारखान्याला खूप मोठ्या प्रमाणात आग लागली. आतापर्यंत या आगीत दोन जण ठार झाले असून १९ जखमी झाले आहेत. जीवित हानीचा आकाडा अजूनही
वाढण्याची शक्यता आहे पंधरा तास होऊन गेले तरी अजूनही आग विझली नाही घटनास्थळावर नाशिकचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी विभागीय आयुक्त ग्रामीण पोलीस आयुक्त व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाला भेट देऊन गेले आहेत. झालेल्या घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे पालकमंत्री हे सुद्धा घटनास्थळावर असून मदत कार्य करत आहेत आरोग्य मंत्री भारतीय पवार हे देखील तातडीने घटनास्थळावर हजर झाल्या या घटनेबद्दल संपूर्ण देशातून व महाराष्ट्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे नाशिक सर्व इगतपुरी परिसरासह दुःख व्यक्त होत असताना जनतेने दुसऱ्यांदा निवडून दिलेले खासदार हेमंत गोडसे मात्र पर्यटन व वैष्णोदेवी येथे देवदर्शन करत आहे घटनास्थळावर नाशिकचे खासदार दिसले नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे अग्नी तांडव खूपच मोठ्या प्रमाणात असून देशातील ही मोठी घटना आहे अशा वेळेस खासदारांनी जनतेला विश्वासात घेऊन मदत कार्य करणे महत्त्वाचे आहे. परंतु सर्वत्र शोक व्यक्तहोत असताना. नाशिकचे खासदार पर्यटनात व देवदर्शनात गुंग आहेत नववर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने मुंडेगाव परिसर हजर राहावे दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये मुंडेगाव इगतपुरी परिसरातून मोठ्या प्रमाणात मतदान याच भागातून खासदार हेमंत गोडसेंना झाले आहे दरम्यान घटनास्थळी हजर नसल्याने परिसरातील नागरिकांकडून नाराजी व संताप व्यक्त होत आहे.