ब्रेकिंग

गरुड झेप प्रतिष्ठान च्या वाहतूक सुरक्षा अभियानाचे 2300 दिवस पूर्ण.

गरुड झेप प्रतिष्ठान च्या वाहतूक सुरक्षा अभियानाचे 2300 दिवस पूर्ण

नाशिक जनमत. गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन , गोदावरी स्वच्छता अभियान , बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 2300 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे.
25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे .याचे 16 जागतिक विक्रम झाले आहेत .ब्राहो इंटरनॅशनल व वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स ,लंडन यामध्ये नोंद झाली आहे .
आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे .नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे. गेली 2300 दिवस गरुड झेप चे कार्यकर्ते – डॉ संदीप भानोसे ,संकेत भानोसे ,संगीता भानोसे ,रेणू भानोसे , सौरव भंडारी, निखिल तेलगोटे , दर्शन चव्हाणके, सागर बोडके ,अंजना प्रधान , अजिंक्य तरटे ,रवींद्र जोशी, मनोहर जोशी ,रवींद्र कुलकर्णी ,अमोल अहिरे , यश साबळे , मनीष बाविस्कर ,चंद्रकांत भानोसे.
ट्राफिक पोलीस श्री.राजेंद्र साळवे व
श्री.अशोक शिंदे तसेच
हिरवांकुर फाउंडेशन तर्फे
अध्यक्ष श्री.निलय बाबु शाह,
श्री. दिलीप गुळवे,श्री.संजय पवार,श्री.चेतन बागमार,श्री.निशांत शाह,डॉ.ऋषभ गुंडेचा,सौ.राखी शाह,
कु.दानवी लाकडे व इतर कार्यकर्ते अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत . सातत्यपूर्ण 2300 दिवस एखाद्या अभियान राबवणे यासाठी चिकाटी , सकारात्मक विचार, संयम ध्येयनिश्चिती कार्य प्रेरणा व राष्ट्रभक्ती तसेच समाजाप्रती अतिउप्रेम आवश्यक आहेत.

 

 


पुढील टार्गेट सातत्यपूर्ण तीन हजार दिवस असे गरुड झेप चे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी जाहीर केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे