ब्रेकिंग

पोलीस हवालदार शरद हेंबाडे यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने गौरव.

पोलीस हवालदार शरद हेंबाडे यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने गौरव

 

नाशिक – जनमत

अँटी करप्शन ब्युरो नाशिकचे पोलीस हवालदार शरद हेंबाडे यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. शरद हेंबाडे यांनी श्री क्षेत्र नाशिक ते श्री क्षेत्र पंढरपूर हेल्थ रन यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांनी 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पंढरपूरमध्ये भारतातील सर्वात वेगवान धावण्याचा विक्रम पूर्ण केला आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याचा गौरव केला आहे. या हेल्थ रन दरम्यान शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि वाटेत ग्रामस्थांशी संवाद साधून आरोग्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पर्यावरणाचा महत्त्वाचा संदेश देण्याबरोबरच बेटी बचाओ, बेटी पढाओ ही आरोग्य दौड यशस्वीपणे पूर्ण करून जनतेच्या मनात एक वेगळा ठसा उमटवून पोलीस दलाला वैभव प्राप्त करून दिले आहे.

 

 

या अनोख्या उपक्रमासाठी शरद हेंबाडे यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, नरेंद्र पवार, अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव, नितीन पाटील, स्वप्नील राजपूत आणि अंमलदार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी अभिनंदन व सत्कार करण्यात आला. नाशिक जनमत संपादक चंद्रकांत धात्रक व त्यांच्या टीम तर्फे शरद राव हेंबाडे यांचे खूप खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे