कंटेनर ने रिक्षाला चिरडले एक जण ठार 3.जखमी.
नाशिक जनमत. नासिक पूना रोडवरील मोहंनद्री गावाच्या पुढे घाटाजवळ एका कंटेनर ने रिक्षाला चिरडले. यात ब्राह्मणवाडे येथील एक महिला जागीच ठार झाले आहे. तर तीन जण जखमी झाल्याची घटना काल दुपारी घडलेली आहे. मयत झालेली महिला नाव मंदाकिनी बाळासाहेब रामराजे वय 45 ब्राह्मणवाडे यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर जखमी मध्ये रिक्षा चालक शिवाजी मनोर रामराजे. आशा विजय रामराजे .कंटेनर चालक जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ब्राह्मणवाडी येथील शिवाजी रामराजे रिक्षा मधून अशा विजय रामराजे आणि मंदाकिनी रामराजे यांना घेऊन ब्राह्मण वाड्याला जात असताना नाना का ठाबा शिवारात पाठीमागून कंटेनर ने धडक दिली अपघातानंतर कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. कंटेनर चालक मध्ये अडकला होता त्याला स्थानिक नागरिकांनी त्याला ओढून बाहेर काढले रिक्षा मधील मंदाकिनी बाळासाहेब रामराजे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जागेवर ठार झाल्या. रिक्षाचा चक्चुर झालेला आहे हवालदार प्रशांत साने जयेश खाडे योगेश शिंदे यांनी घटनास्थळावर धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे ब्राह्मणवाडे गावावर शोक काळा पसरली आहे.