फिरत्या लोकअदालतीत 36 प्रकरणांत तडजोड* *: सचिव शिवाजी इंदलकर*
*फिरत्या लोकअदालतीत 36 प्रकरणांत तडजोड*
*: सचिव शिवाजी इंदलकर*
*27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन*
*नाशिक, दिनांक 11 मे 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने आयोजित फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून विमा कंपन्यांनी प्रलंबित 81 पैकी एकूण 36 प्रकरणात तडजोड करून जखमी झालेल्या पक्षकारांना व मयतांच्या वारसांना एक कोटी 95 लाख 69 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. तसेच जलद न्यायदानासाठी 27 जुलैला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
उच्च न्यायालय, विधी सेवा समिती, मुंबई यांच्या आदेशान्वये व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली या फिरत्या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. पॅनलप्रमुख म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. देशमुख व पॅनल सदस्य म्हणून ॲड. प्रशांत जोशी यांनी काम पाहिले.
लोकअदालतीच्या आयोजनातून सर्वसामान्य पक्षकारांना तात्काळ न्याय मिळून प्रकरणे निकाली निघाल्याने पैसा व वेळेची बचत होते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी 27 जुलै 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील पत्रकात करण्यात आले आ