ब्रेकिंग

सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम*  *करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी* 

 

 

*सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम*

*करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी*

– *सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक पी. एस. प्रद्युम्न*

 

*नाशिक, दिनांक 2 मे, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* लोकसभा निवडणूक भयमुक्त, निःपक्ष आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. मा. भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचार संहितेसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे सर्वांनी पालन करावे. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश 21 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक पी. एस. प्रद्युम्न (भा. प्र. से.) यांनी आज येथे दिले.

 

लोकसभा निवडणूकसंदर्भात 21 नाशिक लोकसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक पोलीस निरीक्षक अकुन सबरवाल (भा. पो. से.), खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत आयोजित संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक खर्च निरीक्षक, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध नोडल अधिकारी उपस्थित होते.

 

कोणत्याही कारणाने फेरमतदानाची वेळ येऊ नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्या प्रशिक्षणात दिलेली जबाबदारी संबंधितांना योग्यरीत्या समजावून द्यावी, असे सांगून मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्याची खात्री करावी. नियुक्त कर्मचारी विशेषतः महिलांची गैरसोय होऊ नये. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी, आदि सूचना योवळी निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. तसेच, संवेदनशील मतदान केंद्रांवर सतर्कतेने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

निवडणुकीत कोणत्याही स्वरुपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची 24 तास तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करावी, अशाही सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.

 

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक जिल्ह्यातील निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक यंत्रणा सतर्कतेने काम करून निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यात संपूर्ण योगदान देईल, असा विश्वास निरीक्षकांना यावेळी दिला.

 

यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती दिली.

 

बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, विधानसभा मतदारसंघ, जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रे, संवेदनशील मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्रे, नियुक्त मनुष्यबळ, ईव्हीएम मशिन्सची सरमिसळ, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबतची माहिती सादर केली.

00000

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे