ब्रेकिंग
विभागीय लोकशाही दिनात सोळा अर्ज दाखल.
*विभागीय लोकशाही दिनात 16 अर्ज दाखल*
नाशिक जनमत *नाशिक, दि.१२ सप्टेंबर, २०२२(विमाका वृत्तसेवा):*
नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय लोकशाही दिनात १० अर्जदारांनी १६ अर्ज दाखल केले आहेत. पुढील लोकशाही दिनाच्या पूर्वी सदर अर्ज निकाली काढण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विभागस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर आयुक्त भानूदास पालवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पद्ममाकर भोसले, उपायुक्त (महसूल) रमेश काळे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, तहसिलदार राजेंद्र नजन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.