प्राणी मित्र कॉलेज ग्रुप यांनी वाचवले एका श्वानाचे जीव.
नाशिक जनमत अंबड परिसरातील लक्ष्मी नगर येथे एका जखमी श्वानाचा भर पावसात उपचार करून प्राणीमित्र कॉलेज ग्रुप यांनी जीव वाचवण्याची घटना घडली आहे लक्ष्मी नगर येथे एक श्वान जखमांमुळे विव्हळत असल्याचा आवाज सकाळ पासून येत होता..दरम्यान या भागातील रहिवासी
श्री. विसपुते यांनी प्राणी मित्र कॉलेज गृप यांना फोन केला असता प्राणी मित्र *श्री. प्रभमेष चौधरी व श्री.यशराज* यांनी भर पावसात रात्री 10 वा. येऊन 1:30 वाजेपर्यंत प्राथमिक उपचार केले. प्रथम दर्शणी श्वसनाची अवस्था खुप विदारक होती..मागिल बाजुस किड लागलेली होती.या वेळी
स्थानिक 2/3 तरूणांनी प्राणी मित्र यांना मदत केली..
रात्री 1:30 वा. कुत्रीला पार्किंग मध्ये ठेवण्यावरू काही लोकांनी त्यांच्याशी वाद घातला. तरी प्राणी मित्रांनी
शेवटी त्यांनी कुत्रीला रात्रीचे वेळी सुरक्षित ठिकाणी ठेऊन उपचार केले. सकाळी उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले..त्यांच्या या कार्याला परिसरातील नागरिकांनी व नाशिक जन्मत संपादक चंद्रकांत धात्रक यांनी सलाम केला . दोन दिवसापासून चालू असलेल्या पावसात अनेक जण आपले घर सोडत नाही परंतु एका शहराच्या जीवासाठी आपला भर पावसात जीव धोक्यात घालून क्षणाचा जीव प्राणी मित्र आणि वाचवला हे काम आणि मित्रांचा कौतुकास्पद आहे एका मुख्य जनावराचा जीव वाचवल्याने नागरिकांनी प्राणिमित्रांना सलाम केला आहे .याकामी स्थानिक श्री. विसपुते व वनअधिकारी श्री.पवार यांनी त्यांना मदत केली