आधारभूत किमती हमी भाव खरेदी योजने अंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी करावी

दिनांक: 18 ऑक्टोबर, 2022
- *आधारभूत किंमत हमीभाव खरेदी योजने अंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी’ करावी*
*- प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड*
*नाशिकः दिनांक 18 ऑक्टोबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
आदिवासी उपयोजना क्षेत्रातील धान (भात) व भरडधान्य (मका, ज्वारी, बाजरी, रागी) आदी आधारभूत किंमत हमीभाव खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात येते. त्यानुसार 2022-23 या वर्षात धान व भरडधान्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी 21 ऑक्टोबर, 2022 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड यांनी केले आहे.
आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी चालू हंगाम 2022-23 मध्ये पीक पेरा लावलेल्याचा 7/12 उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची स्प्ष्ट दिसणारी छायांकित प्रत सोबत आणावी. शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्र किंवा पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी व घोटी येथील उप प्रादेशिक कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. राठोड यांनी कळविले आहे.
धान व भरडधान्य खरेदीसाठी होणारी नोंदणीचे छायाचित्रण होणार असल्याने नोंदणीसाठी अर्जदाराने स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. या नोंदणीच्या अधिक माहितीसाठी 9422673811, 8888342007 व 8411824040 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.