जन्मताच दिव्यांग असलेले सहाने महाराजांना हिंदवी स्वराज्य ग्रुप च्या वतीने शिवराज्याभिषेक दिनी मिळाले वारकरी साहित्य.
साकुर येथील जन्मताच दिव्यांग असलेल्या सहाणे महाराजाना हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या वतीने शिव राज्यभिषेक दिनी मिळाले वारकरी साहित्य
बेेेलगाव कुऱ्हे: लक्ष्मण सोनवणे
नाशीक जनमत. नुसते शिवाजी महाराज डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार युवकांनी डोक्यात घेणे गरजेचे आहे.
असे प्रतिपादन हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापकीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. रुपेश नाठे यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील जन्मताच दिव्यांग असलेले सहाणे महाराज यांना शिव राज्य भिषेक दिनाच्या दिवशी वारकरी साहित्य तसेच शिवचरित्र भेट देण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी छावा संघटनेचे सुनील भोर, सरपंच बाळू आवारी, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवाजी महाराज यांच्या विचारांची माहिती दिली.
डॉ. नाठे पुढे म्हणाले की, माणसामध्येच परमेश्वराचे खरे अस्तित्व आहे. दोन्ही पायाने जन्मताच दिव्यांग असूनही पंढरीनाथ महाराज सहाणे हे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने वारकरी सांप्रदायचे कार्य निस्वार्थी भावनेने करीत असून अनेक लहान लहान मुलांना संस्कारित केले आहे. सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा. पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. रुपेश हरिशचंद्र नाठे यांनी संपर्क साधून दिव्यांग व्यक्तीला आपल्याला मदत करायची आहे असे कळविले त्यानंतर समाजसेवेचा वसा घेतलेले डॉ . रुपेश नाठे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील दोन्ही पायाने जन्मताच दिव्यांग असलेले हभप पंढरीनाथ महाराज सहाणे यांच्या कार्याची दखल घेऊन मुलांना वारकरी शिक्षण देता यावे म्हणून वारकरी साहित्य भेट दिले. यामुळे मुलांना हरिपाठ, अभंग आदी शिक्षण घेण्यास मोठी मदत मिळेल. यावेळी गणेश नाठे, भाऊडू मालूनजकर, गेनू सहाणे, ज्ञानेश्वर माऊली तुपे, समाधान सहाणे, कचरू बाबा सहाणे, गाडेकर ताई, सुमनताई सहाणे, रामा उगले, खंडू कुकडे, विष्णू पंथ सहाणे, जगन सहाणे, त्र्यंबक सहाणे, युवा भजनी मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते