पतंगाच्या मांजाने घेतला मुंबईत पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी.
नाशिक जनमत प्रतिनिधी मकर संक्रात जवळ येत असून पतंग खेळणे आणि टेरेसवर चालू झालेले आहे. दरम्यान पतंग खेळताना वापरण्यात येणाऱ्या मांज्यामुळे अनेक जखमी देखील होत आहे. आज आज मुंबईत अशीच घटना घडली असून एका पोलीस शिपायाचा पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने गळा चिरला गेल्याने दिंडोशी पोलिस स्टेशन चे पोलिस शिपाई क्र 111615/ समीर सुरेश जाधव वय 37 वर्षे रा ठी. बिल्डिंग न 77, वरळी बी डी डी चाळ, रूम न 28, वरळी मुंबई हे 15.30 वाजाताचे सुमारास त्यांचे मोटार सायकल वरून कर्तव्य पूर्ण करून त्यांचे वरळी येथील निवासस्थानी जात असताना वाकोला ब्रिज , सांताक्रुज पुर्व मुंबई याठिकाणी मांजा ने गळा चिरल्याने त्यांना खेरवाडी मोबाईल 1 यांनी उपचार कामी तात्काळ सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे,
सदरची माहिती खेरवाडी पोलीस स्टेशन चे व पो नी राजेंद्र मुळीक यांनी 18.06 वाजता मोबाईल द्वारे कळविले आहे.
सायन रुग्णालयात खेरवाडी पोलीस स्टेशन चे पोलिस पथक हजर असून त्यांचे नातेवाईकांना कळविण्यात आलेले आहे तसेच दिंडोशी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सदर ठिकाणी तात्काळ रवाना करण्यात आलेले आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलीस आधिकारी व कर्मचारी नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे
नाशिक शहरात देखील माजा मुळे अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेची पुनरुक्ती होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच मांजा विक्री करण्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दिवसभर ड्युटी करून आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली आहे अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना असून नागरिकांनी हेल्मेट तसेच गळ्याभोवती रुमाल बाधवा व टू व्हीलर वाहणे सावकाश चालावीत अशी नाशिक जन्मत तर्फे सर्व वांहण धारक व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी नाशिक मधील संभाजी नगर रोडवर अशाच प्रकारे नाशिक जनमत संपादक चंद्रकांत धात्रक यांच्या गळ्याभोवती माज्याझ अडकल्यामुळे शर्टची कॉलर वरअडकल्याने गळ्याभोवती देखील जखम झाली होती. सुदैवाने प्रसंग राखून वाह न थांबवल्याने घटना घडताना वाचली होती. दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी.