पाळीव कुत्र्याने मोठ्याने भुकून वाचवले बिबट्यापासून कुटुंबाचे प्राण.

प्रतिनिधी |नाशिक जन्मत नाशिक शहरामध्ये व रान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असल्याचे समोर दिसत आहे. नाशिक शहराच्या जवळ ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे असल्याचे दिसत आहे. काल सातपूरच्या तिरड शेत येथे एका पाळू स्वानाने आपल्या मालकाचे व कुटुंबाचे बिबट्या जवळ असल्याने संकट बघून मोठ्या मोठ्याने. भुकून मालकाचे प्राण वाचवले
सातपूरच्या तिरडशेत परिसरात बंगल्याच्या आवारात शिरलेला बिबट्या घरमालकावर हल्ल्याच्या तयारीत असतानाच त्यांचा पाळीव कुत्रा टारझन हा भुंकल्याने घरमालकाचेही लक्ष गेले आणि बिबट्याने धूम ठोकल्याने त्यांचे प्राण वाचले. मंगळवारी (दि. ४) रात्री ही घटना घडल्याने तिरडशेतसह परिसरात दहशत पसरली आहे.
तिरडशेत भागातील कैलास जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्या शिरला होता. त्यावेळी बंगल्याबाहेरच पलंगावर त्यांचा पाळीव कुत्रा टारझन हा झोपलेला होता. तर जाधव हे तेथेच काही काम करून घरात जात होते. तेव्हाच बाजूलाच एक बिबट्या त्यांच्यावर हल्ल्याच्या तयारीत होता. मात्र टारझनला बिबट्या आल्याची जाणीव झाली आणि टारझन जोरजोरात ओरडायला लागला. दरम्यान कैलास जाधव यांनी सांगितले की
टारझनमुळे वाचले माझ्या कुटुंबाचे प्राण
• आमचा कुत्रा टारझन हा
बिबट्याला बघताच भुंकला नसता तर काय विपरीत घडले असते याची कल्पनाही करवत नाही. बिबट्यापासून माझ्यासह
मात्र दहशत कायम पत्नी, मुले आम्ही १०० मीटरवरच होतो. कुत्रा भुंकल्याने आम्ही सतर्क झालो. वनविभागाने येथे पिंजरा लावण्याची मागणी कैलास जाधव यांनी केलेली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे. वन विभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. सध्या या परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहे.