नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे कै. शेखर गवळी यांना जीवन गौरव पुरस्कार

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे
कै. शेखर गवळी यांना जीवन गौरव पुरस्कार
नाशिकचे रणजीपटू व महाराष्ट्र क्रिकेट संघाचे ट्रेनर कै. शेखर गवळी यांना नाशिक क्रिकेट साठी दिलेल्या योगदानाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला . २०२१-२२ व २०२२-२३ वर्षांसाठीचा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शरमन हॉल, गुरुदक्षिणा कॉम्प्लेक्स, प्रिं. टी ए कुलकर्णी विद्या नगरी, बीवायके कॉलेज येथे दिमाखदारपणे पार पडला. या समारंभात अडव्होकेट माननीय विलासभाऊ लोणारी यांच्या शुभहस्ते व माजी स्थायी समिति अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे , राजेश टिळे , नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चेअरमन विनोद शहा , सेक्रेटरी समीर रकटे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कै. शेखर गवळी यांची पत्नी दीप्ती गवळी व सुपुत्र देवांश गवळी यांना हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला संघाची कर्णधार ईश्वरी सावकार व रणजीपटू नाशिक जिल्हा क्रिकेट संघाचा कर्णधार सत्यजित बच्छाव यांना “ प्लेयर ऑफ दि इयर ” या खास पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व स्पर्धांतील विजेत्या संघांना तसेच विविध जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कै शेखर गवळी जीवन गौरव पुरस्कार प्रदान ,
प्लेअर ऑफ दि इयर. ईश्वरी सावकार व सत्यजित बच्छाव – छायाचित्र सोबत पाठवीत आहे