भालुर येथे 10 कोटीच्या कामांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते लोकार्पण
भालुर येथे 10 कोटीच्या कामांचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते लोकार्पण
अरुण हिंगमिरे
नांदगाव नाशिक
भालुर येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार व आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत . यामध्ये 7 कोटी रुपयांची कामांचे लोकार्पण तसेच 3 कोटी रुपयांचे प्रस्तावित कामाचे भूमिपूजन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आज केले.
या मध्ये स्वागत कमान, अंगणवाडी 1व 2, स्मशानभूमी, जलशुध्दीकरण केंद्र, बाजार शेड, मंगल कार्यालय, भोजनालय, वधू वर कक्ष अशा विविध विकास कामांचे लोकार्पण आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मुखातून निघालेला शब्द मी फुलासारखा झेलेल. आपल्याला जे जे काही पाहिजे ते सहकार्य मी करेल असे मत आपल्या मनोगतातून आमदार सुहास आण्णा कांदे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य मंत्री भारती ताई पवार दिल्लीहून ऑनलाईन हजार होत्या, आपल्या भाषणात त्यांनी शहरात मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांनी मिळाव्या या हेतूनं विविध योजनेतून हे काम उपलब्ध करून दिले आहे, आमदार सुहास आण्णा कांदे आणि मी त्यांची बहीण मिळून आपल्या मतदारसंघासाठी सदैव विकासाचे धोरण घेऊन काम करत आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच अर्चना निकम, उप सरपंच सिंधुबाई निकम, सरपंच राजाभाऊ पवार , साईनाथ गिडगे, अल्ताफ खान, किरण देवरे, प्रमोद भाबड, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, दत्तराज छाजेड, राजाभाऊ जगताप, बबलू पाटील, किशोर लहाने, बाळासाहेब आव्हाड, अंकुश कातकडे, संजय आहेर, बापूसाहेब जाधव, सागर आहेर, अशोक निकम, सोमनाथ घुगे,पप्पू कुणगर, अशोक आयनोर, राजू सांगळे, कैलास घोरपडे, संतोष लाहिरे, राजेश शिंदे, दशरथ लहीरे, प्रकाश काकड, राजेश निकम, शालूबाई थेटे,दिगंबर निकम,विक्रम निकम, देविदास निकम,मनीषा मेंगळ,राजेश निकम,गणपत निकम, नंदू इल्हे, भागवत पवार, आरती सोनवणे, वसंत निकम,शिवाजी ढगे,विठ्ठल सोमासे, तुकाराम निकम,लहानू निकम,नामदेव पाटील,अरुणा पवार, दत्तू बोराडे,दादासाहेब धनगे, रामदास निकम, ग्रामसेवक वाय.एस.निकम
आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय आहेर यांनी तर सूत्रसंचालन सोमनाथ तळेकर यांनी केले.