इशाल वाडी गावा वर दरड कोसळली. पाच जण ठार अनेक जण मातीच्या धीगरात गाडले गेल्याची भीती.

नाशिक जनमत रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील ईशांत वाडी गावावर रात्री डोंगराची दरड कोसळली असून तीनशे लोकसंख्या असलेले गाव मातीच्या ढिगारा खाली गाडले गेले आहे. आत्तापर्यंत 25 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे व पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचाव कार्यातील कर्मचारी पोहचले असून बचाव कार्य चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन दादा भुसे इत्यादी देखील घटनास्थळावर पोहोचल्याची माहिती मिळत आहे. अतिशय दुर्गम ठिकाणी हे गाव असून या ठिकाणी जेसीब किंवा मोटरसायकल देखील या ठिकाणी जाऊ शकत नाही दोन किलोमीटर ट्रेकिंग करून जावे लागते. पूर्ण गाव शोकाकुल असून मृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. बचाव कार्यातील एक कर्मचारी घटनास्थळावर जात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्युमुखी पडल्याची बातमी येत आहे. दरम्यान आजची सकाळ महाराष्ट्रासाठी काळरात्र ठरली आहे . हेलिकॉप्टर द्वारे मदत कार्य पोहोचवण्याचे काम सुरू होणार असून खराब वातावरणामुळे त्यात अडथळा निर्माण होऊ शकतो मोठ्या प्रमाणात धुके व पाऊस चालू आहे. बचाव कार्यातील व आजूबाजूच्या गावावरील नागरिक या ठिकाणी पोहोचले असून टिकाऊ प वड्या नी माती ठीग्रा रे बाजूला करून मातीखाली घडल्या गेलेल्या नागरिकांना जीवदान देत आहे. जखमींना मुंबई येथे उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. आतापर्यंत तीन जणांची सुखरूप का करण्यात आली आहे. गावातील वातावरण शोकाकुल आहे