ब्रेकिंग

लोकसभा निवडणूक दिंडोरी मतदारसंघ उमेदवार भारती पवार यांना शेतकरी नाराजी नांदगाव तालुका दुष्काळ नाही. बंडखोरी मुळे. व मतदार नाराजी या मुळे निवडणूक जाणार जड.

नाशिक जन्मत  चंद्रकांत धात्रक. दिंडोरी मतदार संघातील भाजपचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांना विजयश्री ओढून आणताना खूपच अवघड ही निवडणूक जाणार आहे. नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्याने नांदगाव तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी वर्ग भारती पवारांवर नाराज आहे तसेच कांद्याला देखील केंद्रीय मंत्री असताना भाव देऊ शकले नाही तसेच निर्यात बंदी करू शकले नसल्याने शेतकरी नाराज झालेला आहे. नाशिक मध्ये देखील आरोग्य केंद्रीय मंत्री असताना जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच संदर्भ रुग्णालय या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात सुविधा झाल्या नसल्याने नाशिककर व जिल्ह्यातील नागरिक नाराज आहेत. तालुक्यातील जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय यांची अवस्था बिकट झालेली आहे कर्मचारी रात्री कामाच्या ठिकाणी थांबत नसल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमाव लागलेला आहे वेळेअभावी उपचार मिळत नाही. आदिवासी भागातील अनेक पाड्वर रुग्णांना उपचाराच्या सुविधा उपलब्ध नाही. सुरगाणा पेठ इत्यादी भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे अनेक भागांमध्ये सुविधा नसल्याने मतदार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय पवारांवर नाराज असल्याचे चित्र आहे. त्यातच घरचा आहेर म्हणून माझी खाजदार हरिचंद्र चव्हाण हे देखील अपक्ष म्हणून उभे आहेत. तसेच पांडू गावित भगुरे इत्यादी नामवंत उमेदवारांशी चौरंगी लढत त्यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही. त्यांना विजयी करण्यासाठी पक्षातील सर्वच नाशिकमधील कार्यकर्ते एकटवले असले तरी त्यांच्यासाठी विजयश्री खूपच अवघड आहे असे चित्र दिसते. दिंडोरी नांदगाव येवला विंचूर इत्यादी  भागातील ग्रामीण मतदार शेतकरी गेल्या काही वर्षापासून हवा दिल झाला आहे शेतकरी वर्गाला नाशिक जिल्ह्यातील आरोग्य केंद्रीय मंत्री दिल्लीत असताना देखील शेतीला हमी भाव देता आला नाही. ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते व आरोग्यसेवा चांगल्या रीतीने देता न आल्याने मतदार नाराज असून येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होणार आहे. महिला मतदारांना देखील नाशिक जनमतने विचारले असता आम्हाला आरोग्यसेवा तसेच पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे असे सुरगाणा पेठ इत्यादी आदिवासी पट्ट्यात नागरिकांनी नाशिक जन्मत कडे बोलून दाखवले. मागील पाच वर्षात संधीचे सोने केंद्रीय मंत्री भारती पवार यांना करता आली नाही असेही काही नागरिकांनी बोलून दाखवले. अनेक उमेदवारांनी अपक्ष केलेली बंडखोरी यामुळे मत विभागणी होऊन त्याचा परिणाम निकालावर नक्कीच होणार आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदार संघातील उमेदवार दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री असताना नाशिक जिल्ह्याला न्याय विकास साधता आल्या नसल्याचा मुख्य मुद्दा जनतेकडे असल्याने मतदारांनी नाराजी दर्शवलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे