ब्रेकिंग
नासिक मध्ये बिबट्याचे दर्शन. दिवसभर नागरिकांत भीती. सिटी सेंटर भागात बघितला बिबट्या.
- नाशिक जनमत. नाशिक शहरात याअगोदरही अनेकदा बिबट्याने दर्शन दिलेल आहे व बिबट्याला नाशिक शहरातून जेरबंद देखील करण्यात आलेले आहे. काल एबीबी सर्कल ते लव्हाटे नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी सातच्या सुमारास एका कार चालकाला बिबट्याचे दर्शन झाले बिबट्या भिंतीवरून झेप घेत नासर्डी नदीच्या झाडाझुडपात गायब झाल्याचे समजते
संबंधित कार चालकाने आपल्या मोबाईल मध्ये बिबट्याचे छायाचित्रण केले हा व्हिडिओ व्हायरल झाल्यान दिवसभर परिसरात भीतीचे वातावरण होते दरम्यान या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी देखील दाखल झाले होते घटनास्थळी त्यांना मातीवर बिबट्याचे असे देखील दिसून आले आहे दरम्यान हा बिबट्या झाडाझुडपातून नंतर गायब झाला आहे सिटी सेंटर ते एबिबी सर्कल रस्त्यावर हा बिबट्या मिळून आल्याचे समजते कार मालक व प्रत्यक्षदर्शी विवेक वडजे यांनी वन विभागाला देखील कळविले दरम्यान या घटनेमुळे दिवसभर बिबट्याची चर्चा नाशिक मध्ये होते नाशिक शहरामध्ये बिबट्या विविध भागात येऊन कुत्र्याची शिकार प्रामुख्याने करत असतात अनेकदा रात्री अंबड डीजीपी नगर 2 केवल पार्क सातपूर इत्यादी परिसरामध्ये मोठ्यामोठ्याने कुत्री देखील भुकत असतात दरम्यान अंधाराचा फायदा घेत कुत्र्याची शिकार करून बिबट्या पुन्हा जात असल्याचा संशय अनेकांनी नाशिक जंनमत जवळ करून बोलून दाखवला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा.9273020944