महामार्ग बस स्थानकात इलेक्ट्रॉनिक बस चि प्रवाशांना धडक. एक महिला ठार दोन जखमी
नाशिक मधील घटना.

नाशिक जन्मत नाशिक शहरातील महामार्ग बस स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस थेट बस स्थानकात प्रवाशांच्या बैठक ठिकाणी एसटी बस घुसली. यामध्ये केरळ येथील एक महिला जागीच ठार झाले आहे. तर दोन प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. शनिवारी रात्री साडेदहा वाजता हा अपघात घडला. मृत्यू झालेली महिला केरळच्या असून इतर दोन प्रवाशांना उपचाराकरता जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की एसटी महामंडळाची शिर्डी ते नाशिक इलेक्ट्रॉनिक बस क्रमांक एम एच 0 4 एल क्यू 94 62 ही महामंडळाने कॉन्ट्रॅक्टर वर घेतलेले आहे. बस चालक निलेश भाबड खाजगी कंपनीचा चालक आहे. त्याचे प्रवासी उतरल्यानंतर बस मागे घेताना नियंत्रण सुटल्याने बस थेट स्थानकात घुसल्याने प्रवासी उभे असलेल्या ठिकाणी घुसल्याने अंजली तारकोंडा ही महिला ठार झाली. इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नाशिक शहरामध्ये सध्या अपघाताच्या घटकांमध्ये वाढ होत आहे. रस्त्याच्या अवस्था बिकट झालेले आहे. मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे राज्य निर्माण. झालेले आहेत. वाहन
चालवणे अवघड झालेले आहे. द्वारका मुंबई नाका आरटीओ ऑफिस रोड. दिंडोरी रोड आडगाव नाका. त्रिमूर्ती चौक अपघाताचे केंद्र बनले आहे. एसटी बस स्थानक देखील आता अपघाताचे केंद्र बनला आहे. पुणे मुंबई बंगलोर शहारा कडे वाटचाल करत असताना नाशिकची अवस्था बिकट आहे. या घटनेमुळे एसटी प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.