बाळ गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवात घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा.
नाशिक जनमत नाशिक मधील नवीन नाशिक बाळ गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणपती उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये संगीत खुर्चीसह अनेक खेळ घेण्यात आले. यातील विजेत्या सौ.गायत्री बोबडे या महिला भगिनी पैठणी साडी विजेती ठरली. पूजा शेळके हीला रोख बक्षीस देण्यात आले तर गायत्री बोबडे या महिलेला पैठणी देण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलेल्या मान्य वराचा सत्कार अध्यक्ष सार्थक घुगे यांनी केला सर्व महिलांना न्यू विकलाग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे, भाजपा सिडको मंडलाचे अध्यक्ष शिवाजी नाना बरके, प्रभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. छायाताई देवांग, ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्ष प्रा. विलास सानप सर, सिडको मंडल सरचिटणीस प्रा. डि.बी. राजपुत सर, प्रदिप केकाणे, चेतन खैरनार, साळी काका, बाळु शेवाळे, सागर नागरे, राहुल वाजे, पुष्पा वाजे, आरती खैरनार, नीता मिश्रा, भक्ती बेलन, पुजा शेवाळे, दिनकर चोथे, डिंगोरे काका, सिद्धार्थ भाटिया, समाधान पाटील, आदित्य विश्वकर्मासह परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सार्थक घुगे यांनी केले होते आभार अनुज केकाणे यांनी मानले