सहलीच्या बस चे ब्रेक फेल. चालकाने वाचवले 40 विद्यार्थ्यांचे प्राण.
नाशिक जनमत काल रविवार सुटी असल्याने इस्कॉन मंदिर शाळेची शैक्षणिक सहल सर्व तीर्थ टाकेत व विश्रामगडयेथे गेली होती.. सहल परत पुन्हा रिटर्न येत असताना. बस चे ब्रेक फेल झाल्याने बस चालक याने बस डोंगराच्या साईट वर नेत चाळीस विद्यार्थ्यांचे जीव वाचवले. या अपघातामध्ये पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तर दहा विद्यार्थी किरकोळ झाले आहेत. शर्मा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसने सहल गेली होती. विश्रामगड बघून टाकीत तीर्थाकडे जाताना वाघोबा जवळ बसचे ब्रेक झाले बस दरीत जाऊ नये म्हणून चालकाने बस डोंगराच्या कडेला कडकवली यामुळे बस पलटी होऊन काही विद्यार्थी जखमी झाले परंतु त्यांचे प्राण वाचले जखमींना धामणगाव येथील एस एम बी टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांनी मदत कार्य मोठ्या प्रमाणावर केले यात शिवा फोडसे. अमोल धा. व अनेकांनी मदत केली..