ब्रेकिंग

महिरावणी विद्यालयाच्या बालवैज्ञानिकांचे ‘ पिको सॅटेलाइट ‘ 

२० जानेवारीला पुण्यात कार्यशाळा, तर १ ९ फेब्रुवारीला चेन्नईतून प्रक्षेपण

महिरावणी विद्यालयाच्या बालवैज्ञानिकांचे ‘ पिको सॅटेलाइट ‘

 

२० जानेवारीला पुण्यात कार्यशाळा, तर १ ९ फेब्रुवारीला चेन्नईतून प्रक्षेपण

 

नाशिक प्रतिनिधी

डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम, राज्य तामिळनाडू, स्पेस झोन इंडिया चेन्नई आणि मार्टिन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिशन अंतर्गत १५० पिको सॅटॅलाइट बनविली जाणार आहे ते १९ फेब्रुवारीला चेन्नईतून पुन्हा वापरता येणाऱ्या रॉकेटद्वारा अवकाशात सोडण्यात येणार आहे.हे सर्व इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी बनवणार असून जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग असल्याने या प्रकल्पाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये होणार आहे. या प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यास पिको उपग्रह आणि रॉकेट बनवण्यासंदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन केले जात असून दिनांक २०जानेवारी २०२३ रोजी पुणे येथील संत ज्ञानेश्वर हॉल, एमआयटी कॉलेज, कोथरूड, येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपग्रह बनवणे संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे यांनी दिली .

सदर कार्यशाळेसाठी मोहिमेतील विद्यार्थ्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील महिरावणी येथील मातोश्री गि.दे. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा विलास काशीद (इ.९वी) व कुमारी क्रितिका माधव खांडबहाले (इ.८वी)यांची निवड केली असून या सहभागी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी व मार्गदर्शनपर ठरेल. या मोहिमेत भारतातून ५००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड,असिष्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि एकेआयएफ प्रशस्तीपत्र मिळणार आहे, अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे राज्य सेक्रेटरी मिलींद चौधरी,राज्य समन्वयिका मनीषा चौधरी यांनी दिली.

या प्रकल्पाच्या मोहीमेत ऋतुजा काशीद व क्रितिका खांडबहाले हे विद्यार्थीनी सहभागी होण्यासाठी राज्य समन्वयिका मनीषा चौधरी, राज्यसचिव मिलिंद चौधरी, नाशिक जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यातील महिरावणी सारख्या ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.यासाठी मुख्याध्यापक अशोक भदाणे,पर्यवेक्षक लव्हंगळे,देवेंद्र देवरे,संजय पवार,संजय गायकवाड, सुरेखा भामरे, दिपाली वाडीले,बाळासाहेब चव्हाण, खंडू लांबे, अरुण शिरसाट, विलास येवले,दिलीप खांडबहाले आदी परिश्रम घेत आहे.

 

चौकट-👇

भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम येथून काम करीत आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलामांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम सेटेलाइट लॉन्च वेहिकल मिशन २०२३ ही महत्वाकांक्षी मोहीम आहे.भविष्यातील वैज्ञानिक शोधून अवकाश संशोधनाचे कुतुहल निर्माण करणे हा हेतु साध्य करण्यात येणार आहे. – मनिषा चौधरी,राज्य समन्वयिका,डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन

 

—————–

फोटो कॅप्शन-महिरावणी येथील गि.दे.पाटील माध्यमिक विद्यालयातील बालवैज्ञानिक ऋतुजा काशीत व कृतिका खांडवाले यांना शुभेच्छा देताना मुख्याध्यापक अशोक भदाणे नंदू पवार पालक माधव खांडबहाले व विलास काशीद देवेंद्र देवरे,फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे,संजय पवार, संजय गायकवाड, सुरेखा भामरे, दिपाली, वाडीले इ.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे