कृषीच्या विद्यार्थ्यांकडून गावातील शेतकऱ्याची शेतात बांधावर जाऊन ई पीक नोंदणी.
*कृषीच्या विद्यार्थ्यांकडून गावातील शेतकऱ्यांची ई – पीक नोंदणी*
नाशिक जनमत त्र्यंबकेश्वर जि.नाशिक
*कृषी तंत्र विद्यालय, चिंचवड येथील कृषी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक नोंदणी केली.*
कृषी विद्यालय व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना ई- पीक नोंदणीचे प्रशिक्षण देण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतःकडे असलेल्या अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून शेतकऱ्यांकडून
ई- पीक नोंदणी करवून घेतली.
आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या
ई- पीक नोंदणी करण्यास खूप सार्या अडचणी येत असतात.
शेतकऱ्यांकडून मोबाईलवर माहीती भरताना होणाऱ्या चुका त्यामुळे अचूक ई – पीक नोंदणी होत नसल्याचे पडताळणी करते वेळी दिसून आले.
प्रधानमंत्री पिक विमा, नैसर्गिक आपत्तीत पिकांची झालेले अतोनात नुकसान,पूर तसेच इतर काही कारणास्तव पिकांचे झालेले नुकसान यासाठी शासनाने जाहीर केलेला आर्थिक मदत किंवा भरपाई मिळण्यासाठी अडचणी येतात. आर्थिक भरपाई मिळताना सुलभता यावी यासाठी ई – पीक नोंदणी करणे गरजेचे आहे.
गाव परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून कुठलाही शेतकरी वंचित राहू नये याकरिता 100 % टक्के ई- पीक नोंदणीचे उद्दिष्ट विद्यार्थी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी ठेवले आहे.
या ई- पीक पाहणी नोंदणी कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा लाभलेला सहभाग बघून गावातील शेतकरी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
शेतकऱ्यांप्रती सहानुभूती, आदरभाव तसेच त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून सांगण्यात आले.
यावेळी महसूल खात्याचे बढे मॅडम, पी.एस.पवार, कृषि प्राचार्य प्रा.विरेन चव्हाण, एस. आर.जाधव, वरिष्ठ पर्यवेक्षक आर. के. देशमुख,बी.के निकम,पर्यवेक्षिका के.के भोये, कृषी सहाय्यक एच.ए. पवार, जे.व्ही.पवार,एस.पी.चौधरी, देविदास भोये आदी उपस्थित होते.