नंदिग्राम एक्सप्रेस मध्ये आरपीएफ जवानांनी वाचवला महिलेचा जीव. रेल्वे मध्ये आरोग्याचा त्रास झाल्यास 139. हेल्पलाइन फोन नंबरचा लाभ घ्यावा. रेल्वे आरपीएफ.
नंदिग्राम एक्सप्रेस मध्ये रेल्वे प्रशासनाच्या आरपीएफने एका महिलेला दिले जीवदान.
नाशिक जनमत नंदिग्राम एक्सप्रेस मध्ये काल नांदेड ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका महिलेला अचानक हृदयाचा त्रास होऊ लागला तसेच तोंडातून फेस व नाकात वृत्त आल्यासारखा प्रकार घडला यावेळेस रेल्वे डब्यातील प्रवाशांची धावपळ उडाली प्रवासी महिलेबरोबर कोणीही नातेवाईक बरोबर नव्हता दरम्यान महिलेकडे फोन होता दरम्यान काही नागरिकांनी ऑन ड्युटी रेल्वे आरपीएफ कर्मचारी मुकुंद कुमार त्यागी आणि जोडीदार अमर अंतीलाल यांनी रेल्वे डब्यामध्ये येऊन सदर रुग्णाची परिस्थिती बघून रेल्वे कंट्रोलला ही माहिती दिली व महिलेला प्राथमिक उपचार देऊन व घाबरू नका ठीक होईल असे सांगितले दरम्यान पुढचे रेल्वे स्टेशन जालना येथे महिलेला उपचारासाठी खाली उतरवण्याची तयारी चालू होती दरम्यान बरोबर कोणी नसल्यामुळे काय करावे हे देखील सुचत नव्हते या वेळेस महिला जवळचा मोबाईल बघून महिलेने केलेल्या फोन नंबर वर संपर्क साधला असता तो फोन त्या महिलेच्या भावाला लागला. त्याने सदर महिला ही माझी बहीण असून बहिणीला फीड्स येत असतात त्यामुळे असा प्रकार होतो असे सांगितले व उपचारासाठी जालन्याला उतरू नका मुंबईला पाठवा असे सांगितले. तोपर्यंत महिला देखील सावध झाली होती सदर महिलेस पाणी वगैरे देऊन संपूर्ण विचारपूस केली व रेल्वे कंट्रोलला फोन करून
सांगितले की सदर माहिती तब्येत आता बरी आहे त्यामुळे रेल्वे टेशन वर डॉक्टरच्या टीमला पाठवू नका. याच वेळेस रेणुका मातेचे दर्शन घेऊन नंदिग्राम एक्सप्रेस मध्ये येत असलेले नाशिक जनमत चे संपादक हेदेखील येथे होते त्यांनी ही घटना समोर बघितली दरम्यान रेल्वे मध्ये कोणाची तब्येत बिघडली तर ताबडतोब मदतीसाठी 139 हेल्पलाइन फोन नंबर वर फोन करावा पुढील स्टेशनवर रुग्णाला उपचारासाठी डॉक्टरची टीम येते किंवा रुग्णाची परिस्थिती बघून उतरून उपचारासाठी दवाखान्यात नेले जाते दरम्यान नंदिग्राम एक्सप्रेस मध्ये असलेले आरपीएफ जवान मुकुल कुमार त्यागी व अमर रातीलाल यांचे प्रवाशांनी कौतुक केले. दरम्यान या घटनेने रेल्वे डब्यामध्ये धावपळ व गर्दी झाली होती. आरपीएफ जवानांच्या बरोबर डब्यातील रेल्वे प्रवासांनी प्रसंग सावधान राखून महिलेचा जीव वाचवला. व पुढील प्रवासासाठी मुंबईपर्यंत महिला इतर प्रवाशांबरोबर मुंबईला रवाना झाली.