घोटीतील नऊ वर्षाच्या चिमुकल्याने केले एकाच वेळी तीन खडतर किल्ले सर. बाल गिर्यारोहकावर कौतुकाचा वर्षाव.

घोटीतील नऊ वर्षाच्या चिमुकल्याने केले एकाच वेळी तीन खडतर किल्ले सर.
बाल गिर्यारोहकावर कौतुकाचा वर्षाव.
घोटी ता.11प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्याला सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेली आहे.या पर्वतरांगेतील अनेक गड किल्ल्याना शिवकालीन वारसा लाभला आहे.यातील अलंग,मदन आणि कुलंग किल्ले अंत्यत खडतर समजले जातात.धाडसी गिर्यारोहकही या किल्ल्यापुढे नतमस्तक होतात.आणि टप्प्याटप्प्याने ही तिन्ही किल्ले सर करतात.मात्र घोटीतील एका धाडसी आणि जिद्दी चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या साथीने एकाच वेळी तिन्ही किल्ले सर करून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,घोटीतील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.भूषण धांडे यांचा नऊ वर्षाचा विहान मुलगा.त्याला लहानपणापासूनच ट्रेकिंगचा छंद. वडिलांनाही हा छंद असल्याने हा छंद विहान यानेही जोपासला.वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विहान याने लहानपणापासूनच लहान व सोपे गडकिल्ले सर केले.मात्र शिवकालीन वारसा लाभलेल्या अलंग,मदन आणि कुलंग या तिन्ही किल्ले एकाच वेळी सर करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.मात्र हे तिन्ही किल्ले खडतर अवघड असल्याने आरंभीच्या काळात वडिलांनी नकार दिला.मात्र विहान हा जिद्दीवर पेटल्याने अखेर हे किल्ले पादाक्रांत करण्याचे निश्चित झाले.
आग ओकणारा सूर्य,अरुंद पाऊलवाट,पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष,जागोजागी पायऱ्या नसल्याने रॉक क्लाइम्बिंग करून चढाई अशी खडतर कसरत करीत विहान यांने आपले वडील डॉ.भूषण धांडे यांच्या साथीने सलगपणे तिन्ही किल्ले यशस्वीपणे सर केले.विहान याला या मोहिमेत डॉ.भूषण धांडे, कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे,घाटघर येथील एकनाथ खडके आदींचे मार्गदर्शन लाभले.विहान याच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.