ओम बजरंग मित्र मंडळाचा अनोखा मित्रता दिवस.

अनोखा मित्रता दिवस
मैत्री दिनानिमित्त ओम बजरंग बहुउद्देशीय सेवा मंडळ व पांडवलेणी ट्रेकिंग ग्रुप यांच्या वतीने लालू या सच्चा श्वानास मित्रतेची अलौकिक भेट म्हणून आज, पंचवड वृक्ष औदुंबर, वड , पिंपळ, बेल व कडूलिंब रोपनाचा कार्यक्रमया राबविण्यात आला.
आमचा सच्चा श्वान लालू मुका जरी असला तरी जगण्याच्या कृतीतून त्याने त्याची मित्रता सिद्ध करून दाखवली.
नुकतेच 3 मे 2023 रोजी त्याचे वृद्धापकाळाने दुःख द नीधन झाले ज्या ठिकाणी त्याचाअंत्यविधी पार पडला त्याच ठिकाणी त्याच्या स्मृती प्रित्यर्थ आठवणी डोळ्यासमोर रहाव्यात म्हणून सदर कार्यक्रम राबवीला गेला.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष बाळू मथुरे, सुरेश अमृतकर, जिभाऊ माळी सर, राजाभाऊ सावंत, सुभाष पाटील,केदा साळवे , प्रकाश काळे, दीपक संसारे, अमित ढगे, रामभाऊ पानपाटील, राहुल अग्निहोत्री, बबन खरोटे आदींनी परिश्रम घेतले