मोफत दंत व आरोग्य शिबीराचा रूग्णांनी लाभ घ्यावा*

: 05 डिसेंबर, 2022
*मोफत दंत व आरोग्य शिबीराचा रूग्णांनी लाभ घ्यावा*
*:डॉ.भारती पवार*
*नाशिक, दिनांक 5 डिसेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
ग्रामीण रूग्णालय नांदगाव येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान व शस्त्रक्रिया चार दिवसीय शिबीराचा लाभ नांदगाव व परिसरातील ग्रामस्थ व जास्तीत जास्त रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले आहे.
जाहीर नोटीस जाहिरात.
आज जिल्हा रुग्णालयमी खाली सही करणार आज दिनांक 2/12/2022 रोजी जाहीर करते की माझे पती रमेश गंगाधर जाधव यांचा मृत्यू दिनांक 26/04/2021 रोजी झाल्याने त्यांच्या नावावर असलेली एस क्रॉस स्मार्ट हायब्रीड झेस्टा कार MH 15 GX 8657 माझ्या नावावर हस्तांतरित करण्यात आली मी श्रीमती रंजना रमेश जाधव. राहणार संकेत बंगलो पेठ रोड टेलिफोन ऑफिस जवळ शिवतेज नगर नाशिक. पारस हक्कदार पत्नी म्हणून मे प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांच्याकडे अर्ज करीत आहे सदर एस क्रॉस माझ्या नावे हस्तांतरित करण्याकामी कोणाचे हरकत असल्यास सात दिवसाच्या आत समक्ष भेटून कळवावे किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांच्याकडे लेखी संपर्क साधावा सात दिवसानंतर आलेल्या तक्रार ची दखल घेतली जाणार नाही कळावे. सही श्रीमती रंजना रमेश जाधव.
जाहिरात समाप्त.
व ग्रामीण रूग्णालय नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दंत व वैद्यकीय आरोग्य शिबीर उद्घाटनप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार दूरदुष्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या. यावेळी आमदार सुहास कांदे, आरोग्य उपंसचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात दूरदृष्यप्रणालीद्वारे तर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जनरल सर्जन डॉ.सुहास पवार, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. रवींद्र मोरे, अस्थिरोग तज्ञ डॉ.विजय मनोरे, दंतरोग तज्ञ डॉ. शशिकांत कातकाडे, त्वचारोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.शुभांगी केदार, बालरोग तज्ञ डॉ.शांतराम राठोड, डॉ. शंशाक तुसे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.हर्षद तुसे, भुलतज्ञ डॉ. काजल साळुंखे प्रत्यक्ष उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार म्हणाल्या, 5 ते 8 डिसेंबर 2022 या चार दिवसीय शिबीरात हार्निया, मुळव्याध्य, हदयरोग विकार व उपचार, कान, नाक, घसा, ॲपेडिक्स, मुतखडा, गर्भपिशवीचे आजार, हातांच्या शस्त्रक्रिया, दंतरोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया या सुविधा रूग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच 182 प्रकारच्या औषधी व 35 प्रकारच्या प्रयोगशाळा तपासणी सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित ग्रामस्थ व रूग्णांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनंत पवार यांनी केले तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी शिबीराबाबत तपशिलवार माहिती यावेळी दिली.
*असे आहे शिबीराचे कार्यक्रम…*
• सोमवार 05 डिसेंबर 2022 रोजी रूग्णांची तपासणी व ॲडमिशन
• मंगळवार 06 डिसेंबर 2022 रोजी दाखल रूग्णांच्या शस्त्रक्रिया
• बुधावार 7 डिसेंबर 2022 रोजी उर्वरित रूग्णांच्या शस्त्रक्रिया
• गुरूवार 8 डिसेंबर 2022 रोजी शस्त्रक्रिया तपासणी