ब्रेकिंग
नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीवर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा.
नाशिक जनमत
- नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीवर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा
नाशिकदि.26 नोव्हेबर (प्रतिनिधि)भारतीय
संविधान दिनानिमित्ताने ऐतिहासिक त्रिरश्मी बुध्दलेणी या ठिकाणी चारिका फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करून भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधान मानवतावादी मुल्यांचे रक्षण करून प्रत्येक नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. याच संविधानाला साक्षी ठेवून चारिका फाउंडेशनच्या माध्यमातून देखील पुढील काळात आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला सशक्तिकरण या क्षेत्रात संघटीत कार्य करून आपण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडणार असल्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सागर रामटेके,सचिव निलेश आंबेडकर,खजिनदार प्रशांत त्रिभुवन, संस्थापक सदस्य प्रमोद नरवाडे,प्रविण ढिवरे,राहूल बनसोडे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला युवा उद्योजक विशाल पाडमुख,संदेश जाधव यांनी उपस्थित राहून चारिका फाउंडेशन संस्थेच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांन सामुहिकरित्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
———————————————–